आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अभिनेत्यासोबत फोटो काढल्याने महिला IPS अडकली वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य अभिनेता निवीन पॉली याच्यासोबत सहायक पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांनी एक फोटो काढला आणि फेसबुकवर शेअर केला. त्याच्याखाली लिहिले, की विथ निवीन पॉली... द करंट सेन्सेशन इन केरला. त्यावर काहींनी टीका केली तर काहींनी लाईक. पण ऑफिशिअल ड्युटीवर असताना अभिनेत्यासोबत फोटो काढल्याने मीडियाने हे प्रकरण उचलून धरले आहे. त्यावर जोसेफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आपली बाजू मांडताना मरीन जोसेफ म्हणाल्या, की कॉलेजमध्ये असलेल्या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. मी ऑफिशिअल ड्युटीवर नव्हते. कार्यक्रम संपल्यावर मी बराच वेळ बसून होते. अशा वेळी काय करणार? स्टेजवर नाचावे का? लोकांनी मला सॅल्युट ठोकावा यासाठी गेले होते का? मीडियाची पातळी घसरली आहे. दया येते मला त्यांच्यावर. अरे प्रकार रोजगाराची संधी मिळविण्यासाठी होऊ नये, अशी मी प्रार्थना करते. पॉली यांच्या सहमतीने हा फोटो काढला आहे.
मेरीन जोसेफ पहिल्यांदाच वादात अडकलेल्या नाहीत. केरळमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केल्यावर त्यांच्या सौंदर्यावर टिप्पणी केली जात असल्याने बराच वाद झाला होता...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मेरीन जोसेफ यांचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...