आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. महिलांच्या गौरवासाठी हा दिवस आपण साजरा करतो. आज आम्ही एका अशा महिलेची काहाणी सांगत आहोत जिने केवळ महिलांचेच नव्हे तर देशाचेही नाव उंचावले आहे . ही काहाणी आहे हरियाणा राज्यतील एका महिला पोलिसची जिचे नाव ऐकताच गुन्हेगार आणि बदमाश यांचा थरकाप उडतो. हरियाणाच्या या लेडी सिंघमचे नाव पारूल कुश जैन आहे. पारूलने पंजाब विद्यापिठातून जीवशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पारुल 2004च्या बॅचची आयपीएस अधिकारी आहे. सध्या ती पंचकीलामध्ये डीसीपी पदावर कार्यरत आहे.
तिचे नाव ऐकताच घाबरतात गुन्हेगार
देशासाठी काही तरी करण्याच्या ओढीने ती पोलिस क्षेत्रात आल्याचे पारूल सांगते. लोकांच्या समस्या सोडवणे हीच तिचे पहिले काम असल्याचे ती सांगते. पारूल ही हरियाणातील धाडसी पोलिस अधिका-यांपैकी एक आहे आणि तिचे नाव ऐकताच गुन्हेगारांचा थरकाप उडतो असे पोलिस अधिकारी पारूल विषयी सांगतात.
हरियाणाची स्थिती उघड आहे
पारूल एका अशा राज्यात काम करते जे राज्य स्त्री भृण हत्या, स्त्रीयाची कमी संख्या यामुळे पूर्ण देशात बदनाम आहे. हरियाणा राज्यातील खाप पंचायतीच्या नावाखाली महिलांना दिली जाणारी वागणुक सर्वानाच माहित आहे. अशा वातावरणात वाढलेली असताना हे यश मिळवणे काही सोपे नाही.
पुढील स्लाइडवर वाचा लेडी सिंघमची काहाणी आणि तिची काम करण्याची पद्धत...