आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Shanlin Was In Modi SPG Posted In Bihar By Nitish

पंतप्रधानांच्या SPG मध्ये तैनात IPS अधिकार्‍याला CM नितीशकुमारांनी आणले बिहारमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - येत्या काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याची आज (शुक्रवार) सेमीफायनल आहे. बिहारमधील 24 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी पुन्हा सत्ता ताब्यात घेऊन देशभरातील चांगले अधिकारी बिहारमध्ये आणण्याचे सत्र सुरु केले आहे. बिहारमधील गुंडगिरी अटोक्यात आणण्यासाठी अनेक दबंग अधिकाऱ्यांनाही बिहारमध्ये आणण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांचे काम सामान्य पोलिसिंगपेक्षा वेगळे राहिलेले आहे. यातील काही पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये (SPG) तर काही दहशतवाद्यांना आस्मान दाखवणारे अधिकारी आहेत.
आज divyamarathi.com तुम्हाला बिहारची राजधानी पाटण्यात नियुक्त झालेले डीआयजी शालीन यांच्याबद्दल सांगणार आहे. आयपीएस अधिकारी शालीन पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात होते.

पंतप्रधानांच्या SPG मध्ये होते तैनात
पाटण्याचे डीआयजी म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी शालीन आधी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीजीमध्ये होते. शालीन यांनी पाटणा पोलिस आयुक्तपदी देखील काम केलेले आहे. तेव्हा त्यांना कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सुरक्षेतही होते तैनात
आयपीएस अधिकारी शालीन पंतप्रधान मोदींच्या आधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षेत होते. ते एसपीजीच्या सर्वात आतील वर्तुळात तैनात राहात असत. पंतप्रधान मोदींच्या परदेश दैऱ्यात ते त्यांच्या अतिशय जवळ असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.

दहशतवाद विरोधी पथकातही होते
शालीन बिहार कॅडरचे 2001 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एसपीजीमधून परल्यानंतर बिहार एटीएसमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. राज्यातील मुंगेर येथे पोलिस आयुक्तपदीही त्यांनी काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आयपीएस शालीन यांची निवडक छायाचित्रे