आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान म्हणाला- विकत घेतलेल्या बकऱ्यांच्या कुर्बानीने कोणती दुआ कबूल होणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी इरफान त्याचा आगामी चित्रपट \'मदारी\'च्या प्रमोशनसाठी आला होता. - Divya Marathi
बुधवारी इरफान त्याचा आगामी चित्रपट \'मदारी\'च्या प्रमोशनसाठी आला होता.
जयपूर - अभिनेता इरफान खानने 'मदारी'च्या प्रमोशनवेळी ईद-उल-जुहा संदर्भात वादग्रस्त स्टेटमेंट केले आहे. तो म्हणाला, 'कुर्बानीचा अर्थ तुमच्या जवळील अतिशय महत्त्वाची वस्तू कुर्बान करणे आहे. बाजारातून दोन बकरे खरेदी करुन आणायचे आणि त्यांची कुर्बानी द्यायची, असा त्याचा अर्थ नाही.' सलमानसारख्या सेलिब्रिटीजला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही इरफान म्हणाला.

का म्हणाला 'सलमानसारख्या सेलिब्रिटीजला सीरियसली घेऊ नये'
- इरफान केवळ तेवढ्यावरच थांबला नाही तर तो म्हणाला, 'तुमचा त्या बकऱ्यांशी काही संबंधच नाही तर त्यांची कुर्बानी देण्याला काय अर्थ ? त्यातून कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारावा की कोणाचे प्राण घेऊन तुम्हाला कसे पुण्य लाभेल ?'
- चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला अभिनेता इरफान म्हणाला, 'आपले जेवढे सण आहेत त्यांचा अर्थ आपण नव्याने समजून घेतला पाहिजे. ते कशासाठी साजरे केले जातात हे जाणून घेतले पाहिजे. आपले सौभाग्य आहे की आपण अशा देशात राहोत जिथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो.'

सेलिब्रिटीज महान आत्मा नाही
- सलमान खान आणि इतर दुसरे सेलिब्रिटीज यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर इरफान म्हणाला, की सेलिब्रिटीजही माणूस आहे. तुम्ही त्यांना महान आत्मा समजू नका. त्यांच्याकडूनही काही चूका होऊ शकतात. त्यांना अधिका गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
- इरफान म्हणाला, 'तुम्ही त्यांना आपला हिरो करा, जे स्वतःच्या स्वार्थाची कुर्बानी देऊन इतरांची मदत करतात.'

इरफान आणखी कोणाला काय म्हणाला...
- इरफानने मदारीच्या प्रमोशनवेळी मनमोकळी बॅटिंग केली. कोणत्याही पक्षाचे किंवा मंत्र्यांचे नाव न घेता राजकारण्यांवर त्याने निशाणा साधला.
- मंत्र्यांबद्दल तो म्हणाला, 'जसे मदारी डमरू वाजवून आश्वासन देतात की सांप आणि मुंगसाची लढाई दाखवतो, पण कधीच दाखवत नाही. तसेच मंत्री करतात. आश्वासने तर खूप देतात पण पूर्ण काहीच करत नाही.'
- इरफान म्हणाला जे लोक इस्लामला बदनाम करतात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात, त्यांच्याविरोधात फतवा निघाला पाहिजे.
- सेन्सॉर बोर्डबद्दल तो म्हणाला, 'टीव्ही आणि इंटरनेटवर लोक काहीही पाहातात. तिथे त्यांना रोखणारे कोणी नाही. मात्र चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड बसवून ठेवले.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जयपूरमध्ये आणखी कुठे गेले इरफान खान..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...