आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता- मणिपूरमध्ये विशेष सशस्त्र दल कायद्याच्या विरोधात 13 वर्षांपासून उपोषण करत असलेल्या इरोम शर्मिला यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची आम आदमी पार्टीची (आप)ऑफर धुडकावून लावली आहे.
‘आप’ने शर्मिलाला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. परंतु राजकारणात येण्याची तिची इच्छा नाही, असे शर्मिलाचे बंधू इरोम सिंघजित यांनी सांगितले. जस्ट पीस फाउंडेशनच्या माध्यमातून ‘आप’ने शर्मिलाला ही ऑफर दिली होती. शर्मिलांच्या सर्मथकांनीच या फाउंडेशनची स्थापना केली. शर्मिला यांना राजकारणात यायचे नाही. लोकहितासाठी त्या संघर्ष सुरूच ठेवू इच्छितात, राजकीय नव्हे तर लोकांच्या पाठबळावर त्या संघर्ष करत राहणार आहेत, असे फाउंडेशनने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.