आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iron Demanding Modi, Tomorrow Ask Wife, Jharkhand Minister Made Comment

लोखंड मागणारे मोदी, उद्या बायको मागतील, झारखंड मंत्र्याची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोकारो (झारखंड) - सरदार पटेल यांच्या भव्य पोलादी पुतळ्यासाठी नरेंद्र मोदींनी चालवलेल्या मोहिमेवर झारखंडचे पशुपालनमंत्री मन्नान मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते सोमवारी म्हणाले, मोदी सध्या लोखंड मागत आहेत, पुढे सोने मागतील, मग बायकोही द्या म्हणतील.
मन्नान म्हणाले, देशभर मोदींचे कोणतेही वारे नाही. देशाची फाळणी करू इच्छिणारेच मोदींचे हवा तयार करत आहेत. आधी लोक ‘जय र्शीराम’ म्हणत विटा मागत. आता ते नमो-नमोचा जप करून लोखंड मागत आहेत. लोखंडाची इतकीच गरज असेल तर त्यांनी गुजरातमध्ये कारखानाच उघडावा. मन्नान यांनी मोदी व अटलबिहारी वाजपेयी यांना ‘चिरकुमार’ म्हणजेच अविवाहित असे संबोधले. दरम्यान, काँग्रेस नेते बी.के. हरिप्रसाद यांनी मोदींची तुलना युगांडाचे हुकूमशाह इदी अमीनशी केली आहे. मोदींच्या गर्लफ्रेंडच्या मित्राला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.