आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isi Spying Ex Iaf Personnel Ranjit Inquiry In Jaisalmer Rajasthan

कॉर्पोरेट्ससारख्या ‘टॅलेंट हंट’द्वारे माजी सैनिकांना एजंट बनवतेय ISI

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- रंजित के. के. वायुदलाचा माजी अधिकारी. आपल्या देशाची संवेदनशील माहिती तो पाकिस्तानला देत होता. पोखरणमध्ये अटक केलेला तलाठी गोरधनसिंह हाही आधी लष्करात होता. त्याच्याजवळ २० सिमकार्ड होते. त्याद्वारे तो व्हॉट्सअॅपवर लष्करी ठाण्यांची छायाचित्रे सीमेपलीकडे पाकिस्तानला पाठवत होता. त्यापूर्वी काही दिवस आधी जोधपूरच्या फलौदी भागातूनही दोन हेरांना अटक झाली होती. त्यापैकी एक जण लष्करात होता. गेल्या काही दिवसांतील ही उदाहरणे.

पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था सामान्यांसह माजी सैनिकांना देशाशी गद्दारी करण्यासाठी प्रवृत्त कशी करते, असा प्रश्न आहे. पठाणकोट हल्ल्यात सहभागी अतिरेकी दिवस तळावर दडून बसले आहेत. म्हणजेच त्यांना या भागाची बित्तंबातमी आहे, हे दिसते.
(हेही वाचा... लव्ह, सेक्स आणि हेरगिरी)

आयएसआयची यंत्रणा
माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंह आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांना सांगितले की, कॉर्पोरेट कंपन्यांसारखे टॅलेंट हंट आणि मुलींचा वापर त्यासाठी होत आहे. आयएसआयने त्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली आहे. या जाळ्यात जो अडकतो तो पुन्हा त्यातून कधीही बाहेर पडूच शकत नाही. त्यादृष्टीने भारताची पश्चिम सीमा खूप महत्त्वाची आहे. आयएसआय या भागात हेर आणि एजंट तयार करत आहे. लष्करी हालचालींवर नजर ठेवल्याने पठाणकोटमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांसाठीची माहिती हेच लोक पाकिस्तानपर्यंत पोहोचवतात.

पाच टप्प्यांत भरती करतात दोन कॉल सेंटर
आयएसआयचे लाहोर आणि कराचीत दोन कॉल सेंटर आहेत. येथूनच या प्रकरणाला खरी सुरुवात होते. एजंट किंवा स्लीपर सेल भारतातून त्यांच्याकडे नावे, मोबाइल क्रमांकाची यादी पाठवतात. यामध्ये सीमाक्षेत्रातील लष्कराशी संबंधित लोक किंवा नातेवाईक आणि लष्करी ठिकाणांजवळ राहणारे नागरिक असतात. यानंतर पाच टप्प्यांत सर्चिंग, टॅलेंट स्पॉटिंगपासून एजंट बनवण्यापर्यंतचे काम असते.

पुढील स्लाइडवर वाचा,
@ देशद्रोह्यांना आयएसआय कशी जाळ्यात ओढते?
@
जोखिम पत्करण्याचे धाडस ठरवते या सहापैकी कोणत्या दर्जाचा एजंट होणार