आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: जुमेची नमाज झाल्यावर दिसला ISIS चा झेंडा, टेलिकॉम कंपन्यांवर दहशतवादी हल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू आणि काश्मिरमध्ये पुन्हा एकदा ISIS चा झेंडा दिसला आहे. जुमेची नमाज झाल्यावर श्रीनगरच्या जामा मशिदीजवळ काही लोकांनी दहशतवादी संघटना ISIS चा झेंडा दाखवला. दुसरीकडे दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील टेलिकॉम कंपन्यांचे शोरुम आणि टॉवरला लक्ष्य केले आहे.
टेलिकॉम कंपन्यांच्या शोरुमवर फेकले ग्रेनेड
दहशतवाद्यांनी आज श्रीनगरमधील दोन टेलिकॉम कंपन्यांच्या शोरुमवर ग्रेनेड हल्ले केले. श्रीनगरमधील करणनगरात असलेल्या एअरसेलच्या शोरुममध्ये आज सकाळी 11.30 वाजता दोन दहशतवादी घुसले. त्यांनी तेथे काम करीत असलेल्या लोकांना शोरुम सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ऑफिसची दारे लावली. आत ग्रेनेड फेकले. या ऑफिसपासून 500 मीटर दूर अंतरावर व्होडाफेनचे शोरुम आहे. काही वेळाने दहशतवाद्यांनी त्यावरही हल्ला चढवला.
मेपासून हल्ल्यांत वाढ
दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीन काश्मिरच्या खोऱ्यात मोबाईल टॉवरना लक्ष्य करीत आहे. मे महिन्यात उत्तर काश्मिरातील सोपोर परिसरात असलेल्या टेलिकॉम टॉवरवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केली होती.
का होताहेत हल्ले
गोपनिय माहिती पोलिसांना मिळत असल्याने चिडलेल्या हिज्बुल मुजाहिदीनने टेलिकॉम कंपन्यांवर हल्ले चढवले आहेत. सध्या ही दहशतवादी संघटना आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या कार्यालयात झाला ग्रेनेड हल्ला...