आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये ISIS चा \'प्रवेश\'? ईदच्या दिवशी पुन्हा श्रीनगरमध्ये फडकवले झेंडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : 6 ऑक्टोबरला हिंसाचारानंतकर फडकवला होता झेंडा
श्रीनगर - आधी पूर आणि त्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर लगातार होणा-या फायरिंगनंतर जम्मू काश्मीर पुन्हा एकदा चर्चेत आहे. ईदच्या नमाज पठनानंतर श्रीनगरमध्ये भडकलेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी इराकची दहशतवादी संघटना ISIS चे झेंडे फडकावले. त्यामुळे सुरक्षा दल आणि गुप्तचर संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा संस्था ISIS चा ध्वज फडकावणा-यांचा शोधात आहे. या प्रकरणी सुरक्षा संस्थांनी अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत या प्रकरणी एक उच्च स्तरीय बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.

श्रीनगरच्या नौहट्टा परिसरातील जामा मशीदीत शुक्रवारी ईदच्या नमाद पठनानंतर भारतविरोधी घोषणा असलेले झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांमधील दोन तरुणांनी सुरक्षारक्षकांसमोर ISIS या दहशतवादी संघटनेचे झेंडेही दाखवले. त्यांनी चेह-यांवर रुमाल बांधलेले होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक सुरू झाली. त्यानंतर बळाचा वापर करत आंदोलकांना हुसकावून लावण्यात आले.

प्रथम 27 जूनला फडकावला होता झेंडा
काश्मीर खो-यात ISIS चा झेंडा फडकावण्याची ही काही पहिलीचे वेळ नाही. त्याआधी 27 जूनला श्रीनगरमध्ये जादीबल येथे एका रॅलीदरम्यान ISIS चा झेंडा फडकावण्यात आला होता. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार गुप्तचर विभागाच्या अधिका-यांची दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. काश्मीरमध्ये आधीच जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन अशी दहशतवादी संघटनांची पाळंमुळं आहेत. त्यात ISIS ची भर पडल्यास सुरक्षा संस्थांसाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

पुढे पाहा, ईदच्या दिवशी झेंडा फडकावल्याचे PHOTO