आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पुन्‍हा फडकवला ISIS चा झेंडा, संघटना भारतात येत असल्याचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटेामध्‍ये क्लिक करा. - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटेामध्‍ये क्लिक करा.
श्रीनगर - सीमे पलिकडून सुरू असलेली घोसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये आता शुक्रवारी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे बॅनर झळकले . शुक्रवारच्या नमाजनंतर ISIS चे झेंडे फडकवण्यात आले. त्यावर ISIS लवकरच येत असल्याचे लिहिलेले होते. श्रीनगरच्या जामा मशिद भागात फडकवण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचेही झेंडे होते.
शुक्रवारची नमाज झाल्यानंतर अशी घटना होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणेंना होती, त्यामुळे त्यांनी आधीच बंदोबस्त तैनात ठेवला होता. गेल्या काही आठवड्यांपासून खोऱ्यात अशा घटना वारंवार होत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कट्टरपंथी नेत्यांना सोडून देण्यात यावे यासाठी हे लोक आग्रही आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी दक्ष राहून सर्व प्रकरण हताळले. त्यामुळे आंदोलकांना हिंसाचार करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, उधमपूर येथे बीएसएफच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर खोऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मागील शुक्रवारी देखील भारत विरोधी झेंडे
मागील शुक्रवारी देखील काश्मीरमध्ये आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले होते. तेव्हा पोलिस आणि लष्कराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली होती.
श्रीनगरमध्‍ये कधी आणि कसे दिसले झेंडे
- 17 जुलै शुक्रवारी श्रीनगरच्‍या नोहट्टा परिसरातील एका मस्जिदमध्‍ये शुक्रवारच्‍या नमाजनंतर विरोध भडकला. काहींनी आयएसआयएस आणि लश्कर-ए-तोयबाचे झंडे फडकवले.
- 24 जुलैला श्रीनगरच्‍या जामिया मस्जिदमध्‍ये नमाजनंतर काही लोकांनी आयएसआयएस दिसून आला. झेंडा घेऊन असणा-यांचा चेहरा झाकलेला होता.
- 31 जुलैला याच मस्जिदीबाहेर नमाजनंतर आयएसआयएस आणि लश्कर-ए-तोयबाचे झेंडे दिसून आलेत.