आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Release Video Showing Beheading American Journalist Steven Sotloff

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS ने आणखी एका अमेरिकन पत्रकाराचे शीर कापले, बघा जिवाचा थरकाप उडवणारा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - ISIS ने जारी केलेल्या व्हिडिओतील फोटो

वॉशिंग्टन - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने आणखी एका अमेरिकन पत्रकाराचे शीर कापल्याचा दावा केला आहे. मंगळवारी ISIS ने एका सोशल साइटवर पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफचे शीर कापण्याचा व्हिडिओ जारी केला. ‘अ सेकंड मॅसेज टू अमेरिका’ असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओमध्ये दहशतवादी सॉटलॉफचे शीर कापताना दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये सॉटलॉफचा देशाच्या नावाने संदेश दाखवण्यात आला आहे. इराकमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाची किंमत आम्हाला मोजावी लागत असल्याचे, सॉटलॉफ या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.

अमेरिकेने अद्याप या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही. अमेरिकेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ खरा आहे किंवा नाही याबाबत गुप्तचर संस्था तपास करत आहेत. व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी बंदी बनवलेल्या डेव्हीड हँस या ब्रिटीश नागरिकाच्या हत्येची धमकीही दिली आहे.

40 वर्षीय स्टीव्हन नोव्हेंबर 2013 मध्ये सीरियामधून बेपत्ता झाला होता. जेम्स फॉले याच्या हत्येच्या व्हिडिओमध्येच स्टीव्हनच्या हत्येची धमकी देण्यात आली होती. इराकमध्ये हल्ले बंद केले नाही तर पुढल्या वेळी सॉटलॉफरचीही हत्या केली जाईल अशी धमकी अमेरिकेला देण्यात आली होती. ओबामांच्या पुढच्या पावलावर स्टीव्हनचे भवितव्य अवलंबून असल्याचेही व्हिडिओमध्ये म्हटले होते.
पुढील स्लाईडवर बघा, जिवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ....