आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Supporter Arrested From Aurangabad, Mumbai, UP And Karnataka

IS संशयिताच्या पत्नीचा आरोप; ना अरेस्ट ना सर्च वॉरंट, डोक्यावर बंदूक ताणून घेऊन गेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॉफ्टवेअर इंजिनिअर अफजलची पत्नी बुसराने एनआयएवर आरोप केले. - Divya Marathi
सॉफ्टवेअर इंजिनिअर अफजलची पत्नी बुसराने एनआयएवर आरोप केले.
औरंगाबाद/बंगळुरु - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी 14 जणांना अटक केली आहे. शनिवारी महाराष्ट्रातील औरंगाबादमधून एकाला अटक करण्यात आले. त्याचे नाव इम्रान पठाण आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या बंगळुरुतील कारवाईत सॉफ्टवेअर इंजिनिअर अफजलला अटक झाली.
आयएसशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या संशयित अफजलची पत्नी बुसराने तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आरोप केले आहे. बुसराने आरोप केला, की काही लोक आमच्या घरी आले आणि माझ्या पतीला लाथा-बुक्क्या मारू लागले. ते फक्त एवढेच म्हणाले, की याची आयएसआयएससोबत लिंक आहे.
आणखी काय म्हणाल्या बुसरा ...
- गुरुवारी रात्री तीन वाजता आमचे दार ठोठवण्यात आले. दरवाजा उघडल्यानंतर काही लोक घरात घुसले.
- त्यांनी स्वतःला दिल्ली पोलिस असल्याचे सांगितले, मात्र ओळखपत्र दाखवले नाही.
- त्यांनी अफजलला घेऊन जाण्याआधी त्याच्यावर बंदूक ताणली होती.
- अफजलला हातकडी लावून घरातून घेऊन गेले.

ना कोणते पेपर, ना सर्च वॉरंट
- बुसरा म्हणाल्या, त्या लोकांनी ना कोणते पेपर दिले, ना सर्च वॉरंट दाखवले. घरात घुसले आणि माझ्या पतीला सोबत घेऊन गेले. कारणही सांगितले नाही.
- बुसरा यांचा दावा आहे, की त्यांचा पती निर्दोष आहे. त्या म्हणाल्या पोलिसांनी घऱात शस्त्र आहेत का, याची विचारणा केली.
- बंगळुरु येथून आयएसआयएससोबत लिंक असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
- दहशतवादाविरोधात प्रतिबंधक उपायांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हरिद्वारमधून अटक करण्यात आलेले संशयित