आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Supporters In Assam Police Strictly Monitor

आसाममध्ये इसिस समर्थकांवर पोलिसांची काटेकोर निगराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये रस दाखवणाऱ्यांची संख्या आसाममध्ये जास्त असल्याने त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक खागेन शर्मा यांनी मंगळवारी सांगितले. आयएसआयएसची छायाचित्रे इंटरनेटवर फिरत आहेत.
आसाममध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची संख्या जास्त आहे. इथे आयएसआयएसच्या इंटरनेटवरील छायाचित्रांना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. आयएसआयएसविषयीच्या उत्सुकतेमुळे इंटरनेटवर त्यांना प्रसिद्धी मिळत आहे. मात्र, या नागरिकांची संख्या कमी आहे, असे शर्मा यांनी सांगितले. गुप्तचर संस्थांनी देशभर केलेल्या सर्वेक्षणात आयएसआयएसशी संबंधित इंटरनेट ट्रॅफिकवर आसाम आणि जम्मू-काश्मीरचा सर्वाधिक सहभाग असल्याचे आढळून आले आहे. आयएसआयएसमध्ये आसाममधील व्यक्तीच्या सहभागाबाबत आढळून आला नाही. आसाम पोलिस सीआयडी आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्था(एनटीआरओ) आयएसआयएसच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराअंतर्गत एनटीआरओ
काम करते.