आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात 6 महिने ठेवला बहिणीचा मृतदेह, अर्धा जळालेला वडिलांचा मृतदेहही सापडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकालाचा रहिवासी पार्थ डे (डाव्याकडे) आणि त्याची बहिण देवज्ञानी डे (उजवीकडे) - Divya Marathi
कोलकालाचा रहिवासी पार्थ डे (डाव्याकडे) आणि त्याची बहिण देवज्ञानी डे (उजवीकडे)
(फोटो: कोलकातालाचा रहिवासी पार्थ डे (डाव्याकडे) आणि त्याची बहिण देवज्ञानी डे (उजवीकडे)
कोलकाता- रॉबिन्सन लेन भागातील एका फ्लॅटमध्ये एक व्यक्ति मागील सहा महिन्यांपासून त्याच्या बहिणीच्या मृतदेहासोबत राहात होता. फ्लॅटला आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ही धक्कादायक माहिती उजेडात आली. पार्थ डे असे या व्यक्तीचे नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फ्लॅटमध्ये पार्थच्या वडीलांचा जळालेला मृतदेह, एका महिलेचा मृतदेह आणि दोन लेबराडोर कुत्र्यांचे सापळे आढळून आले. खाद्यपदार्थांचे पॅकेट्‍स घरात सर्वत्र पसरलेले पाहून पोलिसही चक्रावून गेले.
मिळालेली माहिती अशी की, पार्थ डेचे आपल्या थोरली बहिण देवज्ञानी डे हिच्या जीवापाड प्रेम होते. या प्रेमामुळे त्याने बहिणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले नाही. सहा महिन्यांपासून तो तिच्या मृतदेहासोबत राहात होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवज्ञानी डे हिचा मृत्यु झाला होता.

देवज्ञानीचा आत्मा ‍फिरतो घरात...
देवज्ञानीचा आत्मा दररोज येथे जेवण करण्यासाठी येतो, असे पार्थने पोलिस चौकशीत सांगितले. त्यामुळे पार्थ दररोज आपल्या लाडक्या बहिणीसाठी जेवण ठेवत होता.

कुत्र्यांच्या मृत्यु देवज्ञानी केला होता अन्नत्याग
‘आईचा मृत्यु झाल्यानंतर मी नोकरी सोडली. देवज्ञानी ही शिक्षिका होती. लेबराडोर कुत्र्यांच्या मृत्युनंतर तिला प्रचंड धक्का बसला होता. तिने अन्नत्याग केले होते. यातच डिसेंबर, 2014 मध्ये तिचा मृत्यु झाला. मी आणि माझे वडिलांचे तिच्यात खूप जीव होता. यामुळे आम्ही तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले नाही.’असे पार्थ डेने पोलिसांना सांगितले.

गुरुवारी या फ्लॅटला आग लागण्‍याची सूचना मिळताच पोलिस फ्लॅटमध्ये दाखल झाले. पार्थ डेचे (47) वडील अरविंद डे (77) यांनी बाथरुममध्ये स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी अरविंद डे यांचा अर्धजळीत मृतदेह ताब्यात घेतला. याशिवाय देवज्ञानीचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. या मृतदेहाचा सापळा झाला आहे.

अरविंद डे यांची एक सुसाइड नोट देखील पोलिसांना सापडली आहे. आपल्या मृत्युला कोणीही जबाबदार नसल्याचे त्यात अरविंद डे यांनी आत्महत्या करण्‍यापूर्वी लिहिल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राइम) पल्लव कांति घोष यांनी दिली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो