आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isro Begins Official Countdown To Historic Mars Orbiter Mission

मंगळवारी भारत मंगळाच्या दिशेने; श्रीहरिकोटातून दुपारी 2.38 वाजता प्रक्षेपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या साडेछप्पन तासांचे काउंटडाऊन श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रात रविवारी सुरू झाले. नियोजित कार्यक्रमानुसार, सकाळी 6.08 वाजता काउंटडाऊनला सुरुवात झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या प्रवक्त्याने दिली.

उपग्रह प्रक्षेपक वाहन पीएसएलव्ही सी 25 च्या साहाय्याने मंगळयान सोडण्यात येईल. यान 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.38 अंतराळाच्या दिशेने झेपावेल. गुरुवारी मंगळ मोहिमेच्या यशस्वी रंगीत तालिमीनंतर लॉँच अँथोरायझेशन बोर्डाने शुक्रवारी प्रक्षेपणाला मंजुरी दिली. पृथ्वीच्या कक्षेत यान सोडण्यासाठी अग्निबाणाला 40 मिनिटे लागतील, अशी शक्यता आहे. पोर्ट ब्लेअर, बंगळुरूनजीकच्या बेलालू, ब्रुनई, दक्षिण प्रशांत महासागरातील शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या नालंदा व यमुना केंद्रावरून प्रक्षेपक वाहनावर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रक्षेपणानंतर उपग्रह 20-25 दिवस पृथ्वीला परिक्रमा घालेल. यानंतर मंगळ ग्रहाच्या दिशेने यानाचा प्रवास सुरू होईल. 24 सप्टेंबर 2014 रोजी यान मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेसाठी 450 कोटी रुपये खर्च आला आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपनंतर अशी मोहीम हाती घेणारा भारत चौथा देश ठरला आहे.