आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा पहिला-वहिला अॅस्ट्रोसॅट लॉन्च, US नेही घेतली आपली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरीकोटा येथून भारताचे पहिले ऑब्जर्व्हेटरी अॅस्ट्रोसॅट PSLV-C30 लॉन्च केले. - Divya Marathi
श्रीहरीकोटा येथून भारताचे पहिले ऑब्जर्व्हेटरी अॅस्ट्रोसॅट PSLV-C30 लॉन्च केले.
श्रीहरीकोटा - अंतराळातून पृथ्वीचे वैज्ञानिक विश्लेषण करण्याच्या उद्देशाने भारताने सोमवारी सकाळी 10 वाजता आपले पहिले ऑब्जर्व्हेटरी अॅस्ट्रोसॅट PSLV-C30 लॉन्च केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ते लॉन्च करण्यात आले. येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून त्याचे आणखी सहा विदेशी उपग्रहांसोबत प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अमेरिकेने प्रथमच उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताची मदत घेतली.
भारत जगातील चौथा देश
अॅस्ट्रोसॅट पहिली भारतीय बनावटीची अंतराळातील वेधशाळा असणार आहे. असे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. प्रक्षेपणानंतर 22 मिनीटांनी अॅस्ट्रोसॅट अंतराळात पोहोचल्याचे सांगितल्या गेले. स्पेस फॅसिलिटी मिळवणाऱ्या देशांच्या पंक्तित आता भारताची गणना होऊ लागली आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि जपानने स्पेस ऑब्जर्व्हेटरी लॉन्च केले आहेत.
काय आहे अॅस्ट्रोसॅट
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) माहितीनूसार, उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवर होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करुन त्याचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने या अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. अॅस्ट्रोसॅटच्या माध्यमातून अल्ट्राव्हायलेट रे, एक्स-रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यासारख्यांचे विश्लेषण केले जाईल. त्यासोबतच मल्टी-व्हेवलेंथ ऑब्जर्व्हेटरीच्या माध्यमातून ताऱ्यांच्या मधील अंतरही मोजता येईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीय बनावटीचे अॅस्ट्रोसॅट