आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्‍वी प्रक्षेपण; पाक वगळता 6 देशांना मिळणार या सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - इस्‍त्रोने शुक्रवारी श्रीहरीकोटा येथून 2230 किलो वजनाच्‍या दक्षिण आशिया उपग्रहाचे (जीसॅट-९) यशस्‍वी प्रक्षेपण केले आहे. दुपारी 4.57 वाजता 'नॉटी बॉय' या रॉकेटद्वारे उपग्रहाचे यशस्‍वी प्रक्षेपण करण्‍यात आले. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे 450 कोटी रुपये आहे. दक्षिण आशियासाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सार्क देशांतील आठपैकी सात सदस्य या प्रकल्पाचा भाग आहेत. 

आम्‍हाला तुमचा अभिमान आहे: पंतप्रधान मोदी 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्‍त्रोच्‍या शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. 'हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्‍हाला तुमचा अभिमान आहे', असे मोदी म्‍हणाले. 
- यानंतर व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्‍या माध्‍यमातून मोदी यांनी सार्क राष्‍ट्रप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी ते म्‍हणाले, 'भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान या सर्व राष्‍ट्रांना या उपग्रहाचा फायदा होणार आहे. भारतावर विश्‍वास दाखवल्‍याबद्दल मी आपले आभार व्‍यक्‍त करतो.' 
- अफगाणिस्‍तानचे अध्‍यक्ष मो. अशरफ यांनी उपग्रहाचे यशस्‍वी प्रक्षेपण केल्‍याबद्दल भारतीय शास्‍त्रज्ञ आणि मोदी यांचे अभिनंदन केले आहे.    

काय करणार हा उपग्रह?
- दूरसंचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवा उदा. टीव्ही, डीटीएच, व्हीसॅट, टेली एज्युकेशन, टेली मेडिसिन आणि आपत्ती व्यवस्थापन सहकार्य शक्य होईल.
- भागीदार देशांदरम्यान हॉटलाइन उपलब्ध करण्याची क्षमता. हा भाग भूकंप, चक्रीवादळ, पूर, सुनामी यांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी संवादात मदत करेल.
 
पाकिस्तान वगळता सात देशांना डाटा
- भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान हे या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने भारताची ‘भेट’ नाकारत त्यात सहभागी होण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
-  भारताकडून आपल्याला कोणतीही ‘भेट’ घेण्याची इच्छा नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
 
पंतप्रधान होताच मोदींनी मांडला होता सार्क देशांच्या उपग्रहांचा प्रस्ताव :
2014 मध्ये पंतप्रधान होताच नरेंद्र मोदी यांनी सार्कच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानले जात आहे. त्याचा डाटा सार्कच्या सर्व देशांदरम्यान वापरला जाईल. सुरुवातीला त्याचे नाव ‘सार्क उपग्रह’असेच ठेवण्यात आले होते. पाकिस्तान या योजनेत सहभागी न झाल्याने त्याचे नाव अखएर ‘दक्षिण आशिया उपग्रह’ असे ठेवण्यात आले. हा उपग्रह गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सोडला जाणार होता, पण काही कारणास्तव त्याचे प्रक्षेपण विलंबाने झाले. आता शुक्रवारी (5 मे) त्याचे प्रक्षेपण होत आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, यशस्‍वी प्रक्षेपणाचा व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...