आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षांपूर्वी बैलगाडीने केली उपग्रहाची वाहतूक, अाता एकदाच सोडले 20 उपग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८१ मध्ये अॅपल उपग्रह असा बैलगाडीने नेण्यात आला होता. भारताने अवकाश कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा रॉकेट सायकलवर व उपग्रह बैलगाडीवर लादून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जात असत. - Divya Marathi
१९८१ मध्ये अॅपल उपग्रह असा बैलगाडीने नेण्यात आला होता. भारताने अवकाश कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा रॉकेट सायकलवर व उपग्रह बैलगाडीवर लादून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जात असत.
श्रीहरिकोटा - एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात पाठवून भारताने बुधवारी जगाला थक्क करून सोडले. यातील १७ उपग्रह विदेशी होते. यापैकी १३ अमेरिकेचे व कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी या देशांचे चार उपग्रह होते. प्रक्षेपणानंतर अवघ्या २६ मिनिटांत सर्व उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन झाले. ही अत्युच्च कामगिरी साधणारा भारत जगातील रशिया-अमेरिकेनंतर तिसरा देश ठरला.

या क्षेत्रात जगातील अव्वल ३ देशांमध्ये दाखल होण्याचे हे यश मिळवणे भारतासाठी याकरिता महत्त्वाचे की, ३५ वर्षांपूर्वी भारताकडे उपग्रह वाहून नेण्यासाठी वाहन पण नव्हते. बैलगाडीतून तो नेला जात होता. मात्र, आज जगभरातील देश आपल्या पीएसएलव्ही यानाने उपग्रह अवकाशात सोडू पाहत आहेत. याचे कारण म्हणजे, जगातील आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत देशांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याचे कसब फक्त भारताकडेच आहे. सन २००८ मध्ये इस्रोने एका वेळी १० उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला होता. मात्र, २०१३ मध्ये अमेरिकेने २० तर २०१४ मध्ये रशियाने एका वेळी ३३ उपग्रह अवकाशात पाठवून कामगिरी केली होती.

१३ लाख कोटींच्या उपग्रह बाजारपेठेत भारताचा वाटा 4 टक्के
जागतिक उपग्रह बाजारपेठ सुमारे १३ लाख कोटी रुपयांची असून यात अमेरिकेचा वाटा ४१ टक्के तर भारताचा वाटा केवळ टक्के आहे.
- २०१४ पर्यंत जगभरातून १४०० उपग्रह प्रक्षेपित होतील. ही इंडस्ट्री १५ लाख कोटींची होईल.
- भारताने आतापर्यंत ५७ देशांचे उपग्रह प्रक्षेपित करून सुमारे हजार कोटी रुपये कमावले आहेत. २०१४-१५ मध्ये सर्वाधिक ४० परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

यशाचे प्रमाण ८६ टक्के : १९एिप्रल १९७५ पासून आजवर ११३ रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. यातील बरेच चाचणीच्या धर्तीवर होते. या काळात ९७ प्रक्षेपणे यशस्वी झाली. यात मंगलयान चांद्रयान मोहिमांचा समावेश आहे.

नासा आघाडीवर : अमेरिकेचीनासा भारताच्या ४१ वर्षांतील बजेटइतका पैसा सहा महिन्यांतच खर्च करते.
भारताचीआघाडी : पाकिस्तानीअवकाश संस्था सुपार्को इस्रोपूर्वी वर्षे सुरू झाली. मात्र, आतापर्यंत या संस्थेने केवळ दोनच उपग्रह अवकाशात सोडले. तेही परदेशाच्या मदतीने.

२६ मिनिटांत २० उपग्रहांचे प्रक्षेपण, जगात तिसरा देश
- प्रथमच पीएसएलव्हीने २० उपग्रहांचे प्रक्षेपण. २००८ मध्ये १० उपग्रह होते. यासाठीची गुंतवणूक इतर अवकाश संस्थांच्या तुलनेत १० पट कमी.
- अमेरिकी उपग्रहांत गुगलची मालकी असलेल्या टेरा बेलाचा उपग्रह.
- भारताच्या तीनपैकी दोन उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केलेले. स्वयम हा उपग्रह पुण्यातील तर सत्यभामा उपग्रह चेन्नईतील विद्यार्थ्यांनी तयार केला.

सॅटेलाइटचा कसा होणार फायदा
- 2008 मध्ये 10 सॅटेलाइट लॉन्च करण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड इस्त्रोने आज मोडला आहे.
- जगात अशी कामगिरी भारताआधी अमेरिका आणि रशियाने केलेली होती.
- कार्टोसॅट-2 सॅटेलाइटने पाठवण्यात येणारे फोटो शहरी, ग्रामीण, पाण्याचे वाटप आणि इतर दुसऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी मदतीचे ठरणार आहेत.
- पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा 'स्वयंम्' सॅटेलाइट कम्युनिटी रेडिओसाठी मॅसेज पाठवले.
- तर, चेन्नईतील सत्यभागा विद्यापीठाचा 1.5 किलोंचा 'सत्यभामासॅट' ग्रीन हाऊस गॅस संदर्भातील माहिती गोळा करणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> पुण्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण....
>> किती खर्च आला 'स्वयंम्' ला
>> बघा या प्रक्षेपणाचा व्हिडिओ.....
>> इस्रोच्या संशोधकांचा जल्लोष.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर हा लेख वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...