आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isro Mangalyaan Scientist Rajdeep From Rajasthan

शाळेसाठी 13 किमी करायची पायपीट, आज आहे \'मिशन मंगळ\'चा महत्त्वपूर्ण दूवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - एक काळ असा होता की, गावातील कच्च्या रस्त्यावरून जवळपास 13 किमी दूर शाळेत जावे लागत होते. अनेक खाच खळग्यातून रस्ता काढत शाळेचे शिक्षण पुर्ण केले. टूव्हीलर विकत घ्यायचीही आईवडीलांची परिस्थिती नव्हती. मात्र आज त्यांची लाडकी मुलगी राजदीप कौर ही भारतीय अंतराळ संसअथा (इस्रो) च्या सर्वात महत्त्वाच्या मास ऑरबिटर मिशन (MOM) मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राजदीप कौरकडे इस्त्रोने मंगळावरून येणार्‍या फोटोंच्या प्रोसेसिंगची जबाबदारी सोपवली आहे. बूंदी येथील नैनवा गावातील रहिवासी राजदीपला यासाठी इस्त्रोच्या अहमदाबाद सेंटरवरून बंगलुरूला बोलावण्यात आले. तिची 5 वर्षांपूर्वी इस्त्रोमध्ये ज्यूनिअर सायंटिस्ट म्हणून निवड करण्यात आली होती.

राजदीपने 8वी आणि 10वी चे शिक्षण नैनवा येथीस सरकारी शाळेतून पुर्ण केले. त्यानंतर 12वी साठी तिने नैनवाच्या उच्च मा्ध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. यानंतर राजदीपने पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून गोल्ड मेडल मिळवत बीटेक उत्तीर्ण केले. राजदीपचे वडील गुरदीप यांनी सांगितले की, त्यावेळी बीटेक करणार्‍या बॅचमध्ये राजदीप एकमात्र हिंदी माध्यमात शिकलेली मुलगी होती.
कठीण परिश्रम घेत पोहचली यशापर्यंत
सध्या भीलवाडा येथे व्यवसाय करत असलेले गुरदीप म्हणाले की, गावात 12 पर्यंत शाळा नव्हती. त्यामुळे राजदीपला 13 किलोमीटर दूर जावे लागत. जीप अथवा अन्य वाहनाने ती शाळेत जायची. त्यावेळी आमची कौटुंबिक परिस्थितीसुध्दा अशी नव्हती की आम्ही राजदीपला टूव्हिलर घेऊन देऊ शकेल. राजदीपची आई हरविंदर कौर सांगतात की, लहानपणापासूनच राजदीपला विज्ञान या विषयात आवड होती. विज्ञानाच्या आवडीमुळेच तिने एवढे कठीण परिश्रम घेतले.

एक प्रमोशन मिळाले
2009 मध्ये इस्त्रोने ज्यूनिअर सायंटीस्ट असलेल्या राजदीपला एक प्रमोशनही दिले आहे. सध्या त्यांचे पद कॅडर साइंटिस्ट-डी चे आहे. यूजीसीचे माजी चेअरमन आणि प्रसिध्द शास्त्रज्ञ प्रा. यशपाल सुध्दा राजदीपच्या कामाचे कौतुक करतात. त्यांनी एका पुरस्कर सोहळ्यात राजदीपचे स्वागतही केले आहे.
सोडली टीसीएसची नोकरी
राजदीपला रिसर्च अँड डवलपमेंटमध्ये जास्त आवड आहे. त्यामुळे तीने इस्त्रोमध्ये नोकरी लागल्यावर नोएडातील टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमधील नोकरी सोडली.


प्रेरणा: आरटीयू कराएगा यूएवी कॉम्पटीशन

मंगळयानाच्या यशावरून प्रेरणा घेत राजस्थान तंत्रज्ञान विद्यापीठ (आरटीयू) राज्यात एरो स्पेस टॅक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी अनमॅन्ड एअर व्हेईकल (युएव्ही) बनवण्यासाठीची स्पर्धा घेणार आहे. आरटीयूचे कुलगुरू व्यास यांनी इस्त्रोचे चेअरमन डॉ. के. राधाकृष्णन यांना अभिनंदनपर पत्र पाठवले आहे. व्यास म्हणतात की, युएव्हीचा खर्च 60 ते 70 हजार रुपये एवढा असेल. यामध्ये सहभागी होणारे सर्वच स्पर्धक युएव्हीला उडवणार आहेत. यामध्ये सर्वात उत्कृष्ठ प्रदर्शन करणार्‍या विद्यापीठाला गौरवण्यात येईल. महहाराष्ट्रामध्ये युएव्हीने शेतांमध्ये युरीया इत्यादींची फरवारणी होऊ शकते. तसेच व्यास म्हणाले की, कँपसमध्ये सर्वच विषयातील सदस्यांनी एकदुसर्‍यांचे तोंड गोड करत मंगळयानाच्या यशाचा उत्सव साजरा केला.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, राजदीप कौरचे इतर फोटो...