आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण, अंतराळात मानव पाठवण्याच्या दिशेने इस्रोचे पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरिकोटा - मंगलयानाला मिळालेल्या यशानंतर जगभरात देशाचा झेंडा फडकवलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणखी एक महत्त्वाचे मिशन पूर्ण होण्यात्या तयारीत आहे. गुरुवारी सकाळी श्रीहरिकोटायेथून जीएसएलव्हच्या मार्क-3 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रायोगिक उड्डाण यशस्वी झाल्याने अंतराळात मानव पाठवण्याच्या भारताच्या मोहिमेला बळ मिळणार आहे.

फायदा काय?
हे इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात मोठे लाँचींग व्हेइकल आहे. इनसेट-4 श्रेणीतील जड उपग्रह वाहून नेण्याच्या इस्रोच्या स्वदेशी निर्मितीची चाचणी करण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. या मोहीमेच्या यशाने इस्रोच्या अंतराळात मानव पाठवण्याच्या मिशनचा मार्गही सुकर होणार आहे. आतापर्यंतचे जीएसएलव्हीचे वजन 400 टन असायचे. 2000 ते 2500 किलोग्रामचा पेलोड अंतराळात पाठवण्याची त्याची क्षमता होती. पण मार्क-3 अंतराळात 5000 टन वजनाचे सॅटेलाईट आणि प्रवासीही पाठवू शकेल.

कसे आहे जीएसएलव्ही मार्क-3
लांबी – 42.4 मीटर
रॉकेटचे वजन – 630 टन
मजबुती - आतापर्यंतच्या जीएसएलव्हीच्या तुलनेत 50 टक्के अधिक
क्षमता – 5000 किलोग्रामचे सॅटेलाइट 36000 किलोमीटर अंतरावर पाठवण्याची
क्रू मॉडेल - 3.65 टन
रॉकेटसाठीचा खर्च - 155 कोटी
एकूण बजेट - 2500 कोटी रुपये
कब से चल रही है तैयारी -
प्रपोलेंट – 139 टन
अॅटमॉस्फियरिक टेस्टसाठी होते क्रू मॉडेल
जीएसएलव्ही-3 बरोबर क्रू मॉडेलही पाठवण्यात आले होते. यात दोन ते तीन जणांना सोबत नेण्याची क्षमता असते. साडे तीन मीटर व्यासाचे हे क्रू मॉडेल 125 किलोमीटरच्या उंचीवर पोहोचल्यानंतर रॉकेटपासून वेगळे झाले. त्यानंतर अॅटमॉस्फियरिक टेस्ट झाली. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणापासून वर अंतराळात जाऊन पृथ्वीच्या वायुमंडळात परतण्याची क्षमता. याच्या वैज्ञानिक अभ्यासानंतरच भारताच्या अंतराळात मानवाला पाठवण्याच्या मोहिमेचा पाया ठरणार आहे. कारण कोणत्याही यानाच्या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना घर्षण होत असते. त्यामुळे ते 1600 अंश सेल्सिअस गरम होते.
39 वर्षांत 77 वे प्रक्षेपण, यशाची टक्केवारी 90 टक्के
19 एप्रिल, 1975 नंतर इस्रोने आतापर्यंत एकूण 77 रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे. यात अनेक अभ्यासासाठी होते. तर काही मोठ्या मोहिमेचा एक भाग होते. इस्रोचे 69 प्रक्षेपण यशस्वी ठरले त्यात मंगळयान आणि चांद्रयान यांचाही समावेश आहे. तर केवळ 8 प्रक्षेपणांमध्ये अपयश मिळाले आहेत.

13 हजार अब्जच्या सॅटेलाईट उद्योगात भारताची भागीदारी वाढणार
जीएसएलव्ही मार्क-3 ला इस्रोच्या मापदंडावर शंभर टक्के यश मिळाले तर भारताची ग्लोबल सॅटेलाईट मार्केटमध्ये भागीदारी वाढणार आहे. सध्या ही इंडस्ट्री 13 हजार अब्ज रुपयांची आहे. त्यात अमेरिकेची भागीदारी 41 टक्के आहे. तर भारताची भागीदारी 4 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. परदेशी उपग्रह अंतराळात पाठवण्यातून अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडला 1992 ते 2014 या काळात 4408 कोटींची कमाई झाली आहे.
पुढील स्लाइडवर, पाहा PHOTO...