आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवणकामातून झाली स्वयंघोषित राधे मां

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर/ मुकेरिया- राधे माँ पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल साइटवर तिचे मिनी स्कर्टमधील तीन स्टायलिश फोटो व्हायरल झाले आहेत. यातील गुलाबी रंगातील एका फोटोमध्ये ती सोफासेटवर अभिनेत्रीसारखी पहुडल्याचाही फोटो आहे. इतर दोन छायाचित्रांत ती याच ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे. याआधी मुंबईत हुंडा मागितल्याच्या एका विवाहितेच्या तक्रारीवरून तसेच चित्रपट गाण्यांवर डान्स करतानाचे अल्बम, फोटो व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली आहे.
प्राप्त माहितीनुसार राधेमाँचे खरे नाव जसविंदरकौर बब्बू असे असून गुरुदासपूरमधील दोरांगला येथील ती राहणारी आहे. तिला दोन भाऊ व एक बहीण आहे. जसविंदरकौर बब्बूचा विवाह मुकेरिया गावातील मोहनलालसोबत झाला. सुरुवातीला बब्बू तिच्या पतीसोबत राहत होती. तिचा पती त्याच्या भावाच्या मिठाईच्या दुकानात काम करत होता. त्या काळात कपडे शिवून ती पतीला मदत करत असे. १९९९-२००० मध्ये ती मुकेरियाहून मुंबईला गेली. हळूहळू तिने कीर्तनाला जाणे सुरू केले. तिने स्वत:ला माता म्हणवून घेण्यास सुरुवात केली. स्वत: मातेचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या जसविंदरकौर बब्बूने मातेचे तीन डझन फोटो बनवून घेतले होते व स्वत:ला माता म्हणवून घेऊ लागली होती. तिने मातेच्या अवतारातील स्वत:ची छायचित्रे वाटण्यास सुरुवात केली.
जसविंदरकौर बब्बूने महंत रामधीन दासजीला गुरू बनवले. राधे मांने फगवाडा येथे झालेल्या जागरण रात्र कार्यक्रमात स्वत:ला तेथील देवीचा अवतार असल्याचे जाहीर केले. कुणीही भक्त जागेवरून हलणार नाही, हलला तर जाळून भस्म करून टाकीन, असा इशारा तिने दिला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिला आव्हान दिले. नंतर तिला फगवाडा येथून पळवून लावले.

मी आहे नाइट बर्ड
फगवाडा येथील एक व्यक्ती सुरिंदर मित्तलने फोन कॉल रेकॉर्डच्या आधारे दावा केला आहे की, एप्रिलमध्ये त्याला राधे माँचा फोन आला होता. त्यात ती वारंवार "मी तुझ्यावर प्रेम करते,' असे म्हणत होती. इतक्या रात्री फोन करण्याचे कारण विचारले असता "मी तर नाइट बर्ड आहे,' असे उत्तर तिने दिले.