आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा विचारेल प्रश्न - बाबा, तुम्ही प्राप्तिकर जमा केला की नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - बाबा, तुम्ही प्राप्तिकर जमा केला की नाही... असा प्रश्न तुमच्या मुलाने विचारल्यास आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही. हा प्राप्तिकर विभागाच्या नव्या केंद्रीय योजनेचा एक भाग आहे. याला २०१६-१७ मध्येच लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत आयकर अधिकारी स्वत: शाळेत जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आयकरासंबंधी चर्चा करतील.

विभागाच्या वतीने या योजनेसाठी विशेष करून नव्या पिढीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन त्यांना ऐतिहासिक गोष्टी सांगतील तसेच त्यांना सध्याची प्राथमिकता काय? यासंबधी माहिती देतील. करदात्यांनी दिलेल्या एक-एक रुपयाचा वापर कशा पद्धतीने देशाच्या विकासासाठी करण्यात येतो याची माहिती देतील. तसेच विद्यार्थांना कर भरण्याचे महत्त्व आणि काळ्या पैशापासून सुरू असलेल्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देतील.

प्राप्तिकर विभागाच्या वतीने ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे प्राप्तीकर विभागातील सूत्रांनी सांगितले. मुख्य प्रधान आयुक्तदेखील प्रत्येक तिमाहीत एका शाळेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पद्धतीने आयकर विभागात येणारे विद्यार्थी १६ ते १८ वर्षांदरम्यानचे असतील. या विद्यार्थांना एका विशिष्ट काळानंतर बोलावले जाईल. या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या वतीने कोणतीच कसर राहू दिली जाणार नाही. शहर मोठे असेल आणि शाळांची संख्या जास्त असेल तर लेक्चर आणि भेट देणाऱ्या चमूंची संख्या वाढवली जाऊ शकते असे निर्देशही प्राप्तिकर विभागाने सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. यामुळे पूर्ण शहर आणि सर्व शाळांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे करदात्यांशी सरळ संवाद साधण्यासाठी प्राप्तीकर विभाग गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इच्छित उत्पन्न घोषणा योजना - २०१६ मध्येदेखील यावर जोर देण्यात आला आहे.

युवकांमध्ये जनजागृती
ही एक चांगली सुरुवात आहे. ही मुले जेव्हा मोठी होऊन व्यवसाय सांभाळतील तेव्हा त्यांना प्राप्तिकराचे महत्त्व चांगल्या पद्धतीने माहिती असेल. आमची ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स ऑफ इंडिया- आयसीएआय’ देखील संमेलनात किंवा कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक करदात्याला तसेच विद्यार्थ्याला प्राप्तिकराचे महत्त्व पटवून देत असते.
राजेश जैन, करतज्ज्ञ

प्रणाली पारदर्शक बनेल
छाननी आणि शोध यापेक्षा लोक स्वत: पुढे येऊन आपल्या उत्पन्नानुसार कर जमा करतील हेच योग्य आहे. याच्या जनजागृतीसाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही करणार आहोत. एक पारदर्शक प्रणाली बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणत्या व्यक्तीवर किती कर लागतो हे आम्हाला माहिती आहे. यावर नियंत्रणाच्या नव्या पद्धती आणि नियम तयार झाले आहेत.
अबरार अहमद, मुख्य प्रधान आयुक्त, प्राप्तिकर विभाग
(एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...