Home »National »Other State» It Dept Starts Countrywide Raids Against Petrol Pump Owners

देशभरातील पेट्रोल पंपांवर आयकर विभागाचे छापे, नोटबंदीनंतर 'ब्लॅकमनी' व्हाईट केल्याचा संशय

दिव्य मराठी वेब टीम | Mar 18, 2017, 18:38 PM IST

  • देशभरातील पेट्रोल पंपांवर आयकर विभागाचे छापे, नोटबंदीनंतर 'ब्लॅकमनी' व्हाईट केल्याचा संशय
नवी दिल्ली- प्राप्तीकर विभागाने (आयटी) देशभरातील पेट्रोल पंप आणि एलपीजी डिस्ट्रिब्यूटर्सवर छापेमारी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. नोटबंदीनंतर देशातील बहुतांश पेट्रोल पंपांवर ब्लॅकमनी 'व्हाईट' करण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनातून रद्द करण्‍यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पेट्रोल पंप आणि एलपीजी डिस्ट्रिब्यूटर्सला स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, पेट्रोल पंप मालकांनी या संधीचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात ब्लॅकमनी व्हाईट केल्याचा संशय प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांना आहे. मात्र पेट्रोल पंपांवर छापा टाकण्यात आला नसून सर्व्हे केला जात असल्याचे काही अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

पेट्रोल पंपावरील कॅशबुकची कसून तपासणी
‍मीडिया रिपोर्टनुसार, आयटी अॅक्ट सेक्शन 133 A नुसार अधिकारी ही कारवाई करत आहेत. पंप चालकांच्या कॅशबुकची कसून तपासणी करण्यात येत आहे. पंप चालकांनी नोटबंदीनंतर केलेला बिझनेस आणि त्यांनी बँकांमध्ये डिपॉझिट केलेली रक्कम यात प्रचंड तफावत असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पेट्रोल पंप मालकांनी झालेल्या बिझनेस पेक्षा तब्बल 15 टक्के अतिरिक्त रक्कम बॅंकांमध्ये डिपॉझिट केली असल्याचे उघडकीस आले आहे.

एका अधिकार्‍याने नाव न जाहीर करण्‍याच्या अटीवर सांगितले की, आयकर विभागाकडून देशभरात पेट्रोल पंपांवर सर्व्हेचे काम सुरु आहे. यात पंप चालकांचे कॅशबूक तपाण्यात येत आहे. नोटबंदीनंतर पेट्रोल पंपाच्या एकूण बिझनेसच्या 15 टक्के जास्त रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती. नोटबंदीनंतर पेट्रोल पंपांवर ब्लॅकमनी व्हाईट झाल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. सरकारी ऑईल कंपन्यांकडून याबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. बँकांमध्ये अतिरिक्त डिपॉझिट झालेल्या रकमेचीही चौकशी सुरु आहे.

Next Article

Recommended