आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is Difficult For Cash Strapped Mountaineer Seema Goswami To Return Home After Reached On Everest

युवतींनी कर्ज काढून सर केले एव्हरेस्ट; हरियाणाच्या 10 युवती पोहोचल्या शिखरावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत- मागील पाच वर्षांत हरियाणातील दहा युवतींनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकवला. यापैकी बहुतांश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील आहेत. मात्र, कर्ज घेऊन त्यांनी हे यश सर केले आहे.

१९९२-९३ मध्ये दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरलेल्या रेवाडी जिल्ह्यातील संतोष यादवपासून याची सुरुवात झाली होती. मागच्या महिन्यात २० तारखेलाच कॅथलची सीमा गोस्वामी ही २७ वर्षीय युवती एव्हरेस्ट सर करून परतली आहे.

या अभियानासाठी तिने कर्ज काढले होते. २०१० मध्ये कॅथलच्याच ममता सौदा हिने एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा झळकवला होता. रेवाडीच्या सुनीता चौकनने २५ लाखांचे कर्ज काढून २०११ मध्ये एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. सुनीताची धाकटी बहीण रेखा लक्ष्मीनेही टांझानियातील सर्वात उंच उहरू पीक शिखर सर केले आहे. पानिपतची सुषमा कौशिक, फतेहाबादची कांता दुहन यांनी २०१३ मध्ये तसेच हिस्सारच्या अनिता कुंडूने २०१५ मध्ये एव्हरेस्टचे शिखर गाठले होते. सोनिपत जिल्ह्यातील ताशी आणि नुंग्शी मलिक या जुळ्या बहिणींनी एव्हरेस्टसह सातही खंडांतील सर्वात उंच शिखरे सर केली आहेत.

१८ ते ५५ लाख रुपयांपर्यंत शुल्क
माउंट एव्हरेस्टवर एजन्सीच्या माध्यमातून चढाईचे आयोजन केले जाते. याचे शुल्क १८ लाखांपासून ५५ लाख रुपयांपर्यंत असते. शिवाय उपकरणे आणि स्वत:चे अन्य सामानही सोबत असते. उपकरणांच्या किटची किंमतच पाच लाखांच्या घरात असते.
बातम्या आणखी आहेत...