आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Is 'election Tourism' Season In Kerala News In Marathi

निवडणूक पर्यटन : विदेशींसाठी खास पॅकेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिरुवनंतपूरम - आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टूर ऑपरेटर्सनी सौंदर्य स्थळांबरोबरच केरळमध्ये निवडणूक पर्यटनाचे आयोजन केले आहे. यासाठी काही ऑपरेटर्सनी विदेशी नागरिकांसाठी खास पॅकेज देऊ केले आहे.

निवडणुकीच्या काळात केरळमधील ग्रामीण आणि शहरी भाग रंगबेरंगी पोस्टर्स, बॅनर्सने सजला जाईल. तळागाळात काम करणारे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतील. कोपरा सभा आणि प्रचार फेरीमुळे निवडणुकीतील वातावरण टीपेला पोहोचेल. विदेशी पर्यटकांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव असेल. त्यामुळे अनेक सहल आयोजकांनी त्या दृष्टीने सहल कालावधी निश्चित केला आहे.

2004 मध्ये पहिला प्रयत्न
2004 मध्ये पहिल्यांदा निवडणूक पर्यटनाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड आदी देशांतील 65 पर्यटकांना निवडणूक सहलीची कल्पना आहे. 2009 च्या निवडणुकीत 15 जर्मन पर्यटकांनी अलप्पुझा आणि वरकला येथे निवडणूक काळात भेट दिली होती. विदेशातील सहल आयोजकांशी यासंदर्भात संपर्क साधण्यात आला आहे.