आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गम गावांत वायफाय; असंख्य विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - केंद्र सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम डिजिटल इंडियापासून प्रेरणा घेत चार आयटी व्यावसायिकांनी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील तीन गावांमध्ये मोफत वायफाय सुविधा दिली आहे. जिल्हाधिकारी तरुणकुमार पिठोड यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात मोफत वायफाय सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
डिजिटल इंडियाच्या थीमवर आम्ही बवादिकेडा जागीर, शिवनाथपुरा आणि देवरिया गावात मोफत सेवा सुरू केली असल्याचे चौघांमधील एक युवक शकील अंजुमने दूरध्वनीवरून सांगितले. वायफायच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही सुमारे २ लाख रुपये खर्च केले आहेत. यामुळे संबंधित गावातील साधारण १०० मोबाइल युजर्स वायफाय सुविधा वापरत आहेत. अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी आम्ही साधारण २०० अॅम्पियरचे इन्व्हर्टर बसवले असल्याचे अंजुमने सांगितले. याच्या साहाय्याने बँक ऑफ इंडियाचे किऑस्कही सुरू आहे. तरुणांनी या कामासाठी शासनाची कोणतीही मदत घेतली नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या चौघा तरुणांनी अादर्श उदाहरण घालून दिल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...