आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

500 कोटींचे लग्न; पाच दिवसांनंतर झाडाझडती, रेड्डीच्या खाण कंपनीवर छापा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकमधील बेल्लारी येथे रेड्डी बंधुंची मायनिंग इंडस्ट्री आहे. - Divya Marathi
कर्नाटकमधील बेल्लारी येथे रेड्डी बंधुंची मायनिंग इंडस्ट्री आहे.
बंगळुरू - खाण व्यावसायिक जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या ५०० कोटी रुपयांच्या लग्नखर्चानंतर पाचव्या दिवशी प्राप्तिकर विभागाने झाडाझडती सुरू केली आहे. बंगळुरू आणि हैदराबादमध्ये विवाह कार्याशी संबंधित विक्रेत्यांची चौकशी सुरू झाली आहे.

निश्चलनीकरणानंतर संपूर्ण देशात रोकड टंचाई होती. अशा स्थितीत गेल्या बुधवारी कर्नाटकमध्ये रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात ५० हजारांपेक्षा जास्त पाहुणे सहभागी झाले. या शाही लग्नावर विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित केले. परिणामी सीबीआय व अन्य संस्था रेड्डींच्या मालमत्तेचा आढावा घेण्याच्या तयारीत आहेत.

माजी मंत्री रेड्डी यांच्याविरुद्ध अवैध खाणकामाच्या आरोपावरून गुन्हा दाखल आहे. तीन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर ते गेल्या वर्षी जामिनावर बाहेर आले . रेड्डी यांच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, लग्नावर ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील बराच खर्च नोटबंदीआधी चेकद्वारे करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...