आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Item Girl Dance At Vijapur Prison On 26th Jan To Mark Release Of Prisoners

VIDEO: कैद्यांसाठी मुंबईहून आणल्या आयटम गर्ल्स, 26 जानेवारीला ठेवला डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चांगल्या वागणुकीमुळे शिक्षेत मोठी कपात होण्याची अभिनेता संजय दत्त याच्या बाबतची घटना ताजीच असताना तुरुंगातील आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. चांगल्या वागणुकीमुळे 26 जानेवारीला विजापूर येथील दर्गा प्रिजन कॅम्पसमधून 38 कैद्यांची सुटका करण्यात आली. पण तुरुंग प्रशासनाची कृपा एवढ्यावर थांबली नाही. या निमित्त चक्क आयटम गर्ल्सचा डान्स ठेवण्यात आला होता. यावेळी कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री व्यासपिठावर उपस्थित होते. त्यांच्यासमोर कैद्यांनी आयटम गर्लवर पैसेही उधळले.
26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या निमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. पण यावेळी विजापूर तुरुंगात मात्र वेगळाच प्रकार घडला. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात चक्क आयटम गर्ल्सचा डान्स ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यासाठी मुंबईहून खास मुली बोलविण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाचा व्हिडिओ स्थानिक वाहिनीवरून प्रक्षेपित झाल्यावर कर्नाटकात एकच गोंधळ उडाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डीजीपी सत्यनारायण राव यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी जेल इन्चार्ज पी. एस. आंबेकर, वार्डन संपत आणि हेड कॉन्स्टेबल कुंडाली यांना निलंबित करण्यात आले आहे. बंगळुरु येथून विशेष टीम विजापूरला पाठवण्यात आली असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, मुंबईहून बोलविलेल्या आयटम गर्लने असा केला डान्स.....