थिरुअनंतपुरम - बुकर पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी पूर्वीच महात्मा गांधींवर ''जातीवादी''असल्याचा आरोपल केला आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या संस्थांची नावे त्यांच्या नावावरून ठेवण्यात आली होती, ती बदलण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.
रॉय म्हणाल्या की, या प्रक्रियेची सुरुवात विद्यापीठांची नाव बदलण्यापासून व्हायला हवी. केरळ विद्यापीठात महात्मा अय्यंकाली स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी कदाचित केरळमधील महात्मा गांधी यूनिव्हर्सिटीकडे त्यांचा इशारा असावा.
महात्मा गांधींनी 1936 मध्ये लिहिलेल्या 'आदर्श भंगी' या लेखाचा हवाला देत म्हटले आहे की, 'यात गांधीजी मैला वाहणा-यांना त्यातील मल-मुत्रापासून खत तयार करण्याचा सल्ला देत आहेत. त्यावरुनच त्यांनी जातीव्यवस्था कायम ठेवण्यामध्ये मदत केली, हे स्पष्ट होते.'
आपल्या भाषणात रॉय यांनी भाजपवर जातीवादाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला आहे. वाल्मिक समाजाने अनेक वर्षे समाज स्वच्छ करण्याचे काम केल्याने, अध्यात्मिकरित्या ते स्वच्छ झाले आहेत, असे मोदी म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, रॉय यांच्या वक्तव्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया...