आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: गोवळकोंडा किल्ल्यावर पोहचल्या इवांका ट्रम्प, डिनरचा घेतला नाही आस्वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इवांका ट्रम्प यांनी हैदराबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याला भेट दिली. - Divya Marathi
इवांका ट्रम्प यांनी हैदराबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याला भेट दिली.

हैदराबाद- ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप समिट (GES) 2017 मध्ये सामील होण्यासाठी आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका यांनी बुधवारी गोवळकोंडा किल्ल्याला भेट दिली. इवांका सुरक्षेसाठी हैदराबाद पोलिसांनी आणी यूएस अॅम्बेसीच्या अधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था केली होती. तेलंगणा सरकारने GES मध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी किल्ल्यात विशेष डिनरचेही आयोजन केले होते पण इवांका या त्यात सामील झाल्या नाहीत. 

 

इवांका जाणार होत्या चारमिनार पाहण्यास
- GES 2017 च्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रानंतर इवांका ट्रिडेंट हॉटेलमध्ये गेल्या. त्यांचा तिथेच मुक्काम होता. त्यानंतर त्या गोवळकोंडा किल्ला पाहण्यास गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे काही अधिकारी आणि अमेरिकेतील भारतीय राजदुत नवतेज सरना उपस्थित होते.

- इवांका या चारमिनार पाहण्यास जाणार असल्याचीही चर्चा होती. पण सुरक्षेच्या कारणावरुन त्यांची ही भेट रद्द करण्यात आली. गोवळकोंडा किल्ल्यावरही त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. इवांका यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता.

 

इवांकाने तेलंगणच्या मंत्र्यांना दिले अमेरिकेला भेटीचे निमंत्रण
- तेलगंणाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री तारक रामाराव यांनी इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये सांगितले की, इवांका ट्रम्प यांनी त्यांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले की, आपण लवकरच अमेरिकेला भेट देऊ.
- राव म्हणाले, GES हा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे चांगले व्यासपीठ आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...