आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल शक्य असल्याचे मोदींमुळे सिद्ध- इव्हांका; माेदी-ट्रम्प कन्येच्या हस्ते ‘जीआयएस’चे उद‌्घाटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी मंगळवारी रोबोट “मित्र’चे बटण दाबून जागतिक उद्योजकता संमेलन - २०१७ चे उद््घाटन केले. यादरम्यान इव्हांकाने मोदी यांची प्रशंसा करत म्हटले की, “तुम्ही मिळवलेले यश असाधारण आहे. चहा विक्रीपासून ते पंतप्रधानपदापर्यंतची तुमची झेप पाहता, बदल शक्य असल्याचे सिद्ध होते.’  


मोदी कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणत असल्याचे इव्हांका म्हणाली. भारताची अर्थव्यवस्था तेजीने वाढत आहे. हे संमेलन भारत आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या आर्थिक आणि सुरक्षेतील सहयोगाचे प्रतीक असल्याचे ती म्हणाली. उल्लेखनीय म्हणजे या संमेलनात १२७ देशांतील १२०० पेक्षा जास्त उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. भारतातील सुमारे ४०० आणि अमेरिकेतील सुमारे ३५० प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणारे हे संमेलन “वुमेन फर्स्ट प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ या विषयावर आधारित आहे.  

 

महिलांच्या प्रगतीनेच देशाची प्रगती शक्य : मोदी  
देशाच्या विकासासाठी महिला सशक्तीकरण महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. भारतीय संस्कृतीत महिला शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या प्रगतीनेच देश आणि समाजाची प्रगती शक्य आहे. भारतातील महिलांचा इतिहास मजबूत आहे. मंगळयान व अंतराळ मोहिमेत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

 

इवांकाच्या भाषणातील 7 मुख्य मुद्दे
1) मोदींचे केले कौतुक

- पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत इवांकाने सांगितले की, तुम्ही खूप काही साध्य करत आहात. एका चहावाल्यापासून पंतप्रधान बनण्याचा मोदींचा प्रवास थक्क करणारा आहे. हे हेच दर्शवत आहे की, बदल शक्य आहे. 

- व्हाइट हाऊसमध्ये भारताचा खरा मित्र आहे. भारत जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

 

2) जग घेईल हैदराबादी बिर्याणीचा आस्वाद
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे. नवी विद्यापीठे, जीवनरक्षक औषधे, अवकाश तंत्रज्ञानात भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. हैदराबादी बिर्याणीचा स्वाद जगही चाखेल.

 

3) तुम्ही तुमचे भवितव्य घडविण्यासाठी येथे आहात
- आंत्रप्रेनरर्स अर्थव्यवस्थेला पुढे नेत आहेत. त्यासाठीच आपण आज येथे जमले आहोत. आपण केलेल्या कामामुळेच जगातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडु शकतो. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी येथे जमले आहोत. विशेषत: महिला उद्ममशीलतेचे मला कौतुक वाटते. महिला प्रगती करत असतील दर देश यशाच्या आणि प्रगतीच्या शिखरावर आहे असे समजावे. 

 

4) 2014-16 दरम्यान महिला आंत्रप्रेनरर्समध्ये 10 टक्क्यांनी वाढ
- माझे वडील अध्यक्ष बनल्यानंतर मला व्यवसायात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठीच आज आपण येथे जमा झाले आहोत. या माध्यमातून आम्ही अशा व्यवस्थेवर काम करत आहोत ज्या माध्यमातून उद्यमशीलतेला वाव मिळेल. जगभरात 2014-16 दरम्यान महिला आंत्रप्रेनरर्समध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

5) एवढ्या महिलांना पाहिल्याने महिला अभिमान वाटतोय
- या समिटमध्ये 1500 महिला सहभागी झाल्या आहेत. याचा मला अभिमान वाटतो.

 

6) देशाची प्रगती महिलांमुळेच होऊ शकते
- अमेरिकेत महिलांना लघुउद्योगांसाठी देण्यात येणारी कर्जमर्यादा 50 कोटी डॉलरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महिलांची प्रगती झाल्यासच देशाची प्रगती होत असल्याने अमेरिकेत महिलांवर फारसे निर्बंध नाहीत. 

 

7) रियान सारख्या महिला सगळ्यांना प्रेरणा देतात
- रेयान ही केवळ 15 वर्षांची आहे. ती रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी काम करत आहे. रेयान महिलांचे जीवन बदलत आहे. त्याच्यात जग बदलण्याची क्षमता आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...