आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - उमेवादवारी यादी जाहीर करून आघाडी घेतलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता सोमवारी प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. कांचीवरम येथील मंदिरात धार्मिक विधी केल्यानंतर जयललिता प्रचाराचा नारळ फोडतील.
मुख्य प्रतिस्पर्धी द्रमुक, डीएमडीके आणि भाजप सहकारी पक्षांसाठी चाचपडत आहेत. अशा स्थितीत अण्णा द्रमुकने महिनाभरापासून प्रचाराची तयारी केली. 40 पैकी 19 आणि पेद्दुचेरीतील एका मतदारांघात प्राथमिक टप्प्यातील प्रचार पूर्ण झाला आहे. 2011 मध्ये द्रमुकच्या पराभवानंतर जयललिता राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त करू इच्छित आहेत. जयललिता तीन वर्षांची कामगिरी मांडण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये त्या अल्प दरातील कॅँटीन, मिनरल वॉटर आणि अम्मा फार्मसी या लोकप्रिय योजनांमधून प्रचार करण्याच्या तयारीत आहेत.
सर्व जागा जिंकण्याचे उद्दिष्ट
अण्णा द्रमुकने माकप आणि भाकपशी आघाडी केली आहे. तिन्ही पक्षांतील जागा वाटप अद्याप पूर्ण झाले नाही. अण्णा द्रमुकने 40 जागा जाहीर केल्या असल्या तरी आपला पक्ष सहकार्यांसाठी काही जागा सोडेल, असे जयललिता यांनी जाहीर केले आहे. अण्णा द्रमुकने 2009 च्या निवडणुकीत 9 जागा जिंकल्या होत्या. आगामी सरकारमध्ये आपला महत्त्वपूर्ण सहभाग राहावा यासाठी सर्वच सर्व मतदारसंघात विजय मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.