आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री, संस्कृतचे गाढे अभ्यासक जे. बी. पटनायक यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जानकी वल्लभ पटनायक (८९) यांचे तिरूपती येथे मंगळवारी पहाटे निधन झाले. सोमवारी मध्यरात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तिरुपती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा त्यांनी तीन वेळा सांभाळली. तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. ओडिशाचे राज्यपाल एस. सी. जमीर आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जे.बी. पटनायक यांना मंगळवारी श्रंद्धाजली अर्पण केली. राज्यात मंगळवारी दुखवटा म्हणून सुटी जाहीर करण्यात आली होती. अक्षय्यतृतीयेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम राज्य सरकारने रद्द केले. पटनायक यांच्यावर पुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संस्कृत पंडित, साहित्यिकही...
३ जानेवारी १९२७ रोजी जे.बींचा जन्म झाला. सन १९४७ मध्ये उत्कल विद्यापीठातून संस्कृतात बी.ए. केल्यानंतर १९४९ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केले. पटनायक यांचे राज्याच्या सांस्कृतिक व साहित्य विकासात मोलाचे योगदान होते. १९८० मध्ये काँग्रेसच्या या निष्ठावान कार्यकर्त्याची मुख्यमंत्रपदी निवड झाली. १९८९ पर्यंत ते या पदावर होते. १९९५-९९ दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंित्रपद आले. सन २००९ मध्ये त्यांची आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मृत्यूपूर्वी व्यंकटेश्वराची प्रार्थना
सोमवारी मध्यरात्री पटनायक यांनी तिरूमला येथील मंदिरात श्री व्यंकटेश्वराची मनोभावे प्रार्थना केली होती. त्यानंतर काही वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले पण तोवर खूप उशीर झाला होता, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. बी.वेंगाम्मा यांनी सांगितले.

पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे.बी. पटनायक यांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला असून मोदींनी म्हटले आहे की, राज्याच्या विकासात पटनायक यांचे अमूल्य योगदान आहे. जनमानसात रुजलेले नेतृत्व म्हण्ून त्यांची ओळख होती. पटनायक कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.