आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाच्‍या नावावर लूट : घराबाहेबर अडकलेल्‍या तरुणी, महिला \'बेबस\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - हरियाणामध्‍ये सर्वत्र जाटांच्‍या आरक्षण मागणीने पेट घेतला. बहुतांश जिल्‍ह्यात संचारबंदी लागू करण्‍यात आली. त्‍यामुळे जनजीवन ठप्‍प झाले आहे. परंतु, आंदोलनामुळे घराबाहेर अडकलेल्‍या तरुणी आणि महिला हतबल झाल्‍या आहेत. संचारबंदी आणि रास्‍तारोको होत असल्‍याने सुखरुप घरी कसे पोहोचावे, हीच चिंता त्‍यांना लागली आहे. अनेक आजारी लोकांना आवश्‍यक औषधुसुद्धा मिळाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचा आजार वाढत आहे.
चिमुकल्‍याला आई देऊ शकली नाही औषध ...
-राई गावातील रीतू त्यागी यांचा चिमुकला आजारी असल्‍याने त्‍याच्‍या उपचारासाठी त्‍या शनिवारी दिल्‍लीकडे निघाल्‍या.
- त्‍या ज्‍या गाडीमध्‍ये बसल्‍या होत्‍या ती कुमाशपूरपर्यंत पोहोचली. परंतु, त्‍या पुढील रस्‍ता आंदोलकांनी अडवला. त्‍यामुळे त्‍या घराबाहेर अडकून पडल्‍या.
- एवढेच नाही तर आपल्‍या आजारी चिमुकल्‍याला त्‍या वेळेवर औषधसुद्धा देऊ शकल्‍या नाहीत.
आंदोलनाच्‍या नावावर लूट
- रोहतक नंतर झज्जर-बहादुरगड, सोनिपत, गोहानामध्‍येही आंदोलनाच्‍या नावावर काही असामाजिक वृत्‍तीच्‍या लोकांनी दुकान, बाजारपेठेत लूट केल्‍याचे वृत्‍त आहे.
- सोनिपतच्‍या हल्दीराम रेस्टोरेंटमध्‍ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते लुटण्‍यात आले. सिरसामध्‍ये एटीएम मशीन फोडून साडे चार लाख रुपये पळवण्‍यात आले.
- रोहतकमध्‍ये नारायणा कॉम्पलॅक्समध्‍ये लॅपटॉपच्‍या दोन दुकानांमधील मोबाइल आणि लॅपटॉप पळवण्‍यात आले.
- झज्जरमध्‍ये तर वीटाचे मिल्क बूथही सोडले नाही.
- शुक्रवारी रात्री संचारबंदी लागल्‍यानंतर लुटमारीच्‍या घटना वाढल्‍या.
- युवकांच्‍या टोळीकडून लुटमार केली जात असल्‍याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी तर दुकानातील साहित्‍य चोरून दुकानांना आग लावल्‍याच्‍या घटना घडल्‍या.
सिवाहमध्‍ये शेकडो युवकांचा एनएच वनवर हैदोस
सिवाहमध्‍ये एनएच वनवर शेवडो युवकांनी हैदोस घातला. या रस्‍त्‍याने जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना टोल प्लाजावरच अडवले. त्‍यामुळे हजारो वाहनांना चंडीगड किंवा दिल्लीकडे परत जावे लागले.
विदेशी पर्यटकही अडकून पडले
या आंदोलनाचा फटका विदेशी पर्यटकांनाही बसला असून, ते रेल्‍वे स्‍टेशन, हॉटेलमध्‍ये अडकून पडले आहेत. दरम्‍यान, अनेक पर्यटकांना काहीच दिवसांचा व्‍हीसा भारताने दिला. त्‍यामुळे भारत भ्रमणाच्‍या त्‍यांच्‍या नियोजनावर पाणी फेरले गेले असून, फोन, इंटरनेट सेवा ठप्‍प असल्‍याने ते आपल्‍या मायदेशी किंवा दुतावासही संपर्क करू शकत नसल्‍याचे चित्र आहे.