आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादवपूर विद्यापीठात मुव्हीवरुन हाणामारी, डायरेक्टरचा खांदा निखळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जादवपूर विद्यापीठात एबीव्हीपी आणि डाव्यांमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंगवरुन हाणामारी झाली. - Divya Marathi
जादवपूर विद्यापीठात एबीव्हीपी आणि डाव्यांमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंगवरुन हाणामारी झाली.
कोलकाता - येथील जादवपूर विद्यापीठात पुन्हा एकदा राडा झाला आहे. शुक्रवारी रात्री येथे 'हेट स्टोरी' चित्रपटाचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांच्या 'बुद्धा इन ट्रॅफिक जाम' या चित्रपटावरुन डाव्या आणि उजव्या संघटनांचे विद्यार्थी आक्रमक झाले. अनुपम खेर स्टारर या चित्रपटाचे स्क्रिनिंग विद्यापीठात होऊ नये, अशी भूमिका डाव्या संघटनांची होती. या स्क्रिनिंगला विद्यापीठाने परवानगी नाकारली असताना भाजप प्रणित एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेने विद्यापीठात हा चित्रपट दाखवला आणि हिंसा भडकली. यात डायरेक्टरला कॅम्पसमध्ये माझ्यावर हल्ला झाला, मदत करा असे ट्विट करावे लागले.

कसा सुरु झाला वाद
भारतीय जनता पक्ष प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 'बुद्धा इन ट्रॅफिक जाम' चित्रपटाचे समर्थन केले होते. तर डाव्या पक्षांच्या एफएएस आणि डीएसएफ या संघटनांनी त्याला विरोध केला होता.
- 'एफएएस'चा आरोप आहे की हिंसाचाराला सुरुवात एबीव्हीपी आणि त्यांच्याशी संबंधीत थिंक इंडिया ग्रुपने केली. त्यांचा आरोप आहे, की या घटनेत काही बाहेरचे लोक होते, त्यांनी मुलींची छेड काढली.

रात्री आले कुलगुरु
- विद्यापीठाचे कुलगुरु सुरंजन दास रात्री 10 वाजता कॅम्पसमध्ये पोहोचले. त्यानंतर थोड्या वेळातच भाजप नेत्या रुपा गांगुली आणि भाजपचे इतर काही सदस्य पोहोचले.
- त्यांची मागणी होती की एएसएफ आणि डीएसएफने ज्या चार विद्यार्थ्यांना पकडून ठवले आहे त्यांना सोडून देण्यात यावे.
- कुलगुरुंच्या मध्यस्थीनंतर त्या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा विद्यापीठाबाहेरील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
- या विद्यापीठात फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील जेएनयू वरुन आंदोलन झाले होते.

कसा सुरु झाला वाद
- शुक्रवारी रात्री साधारण आठ वाजता विवेक अग्निहोत्री दिग्दर्शीत 'बुद्धा इन ट्रॅफिक जाम' चित्रपट कॅम्पसमध्ये दाखवला जात होता.
- थिंक इंडिया ग्रुपने आधी ऑडिटोरियमची परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने ती नाकारली होती.
- राज्यात निवडणूक सुरु आहे त्यामुळे आचारसंहितेचे कारण प्रशासनाने दिले होते.
- मात्र परवानगी नाकारल्यानंतरही थिंक इंडिया ग्रुपने शुक्रवारी चित्रपट दाखवला. त्यांचा आरोप आहे की डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी आमच्यावर हल्ला केला.
- तर डाव्यांचा आरोप आहे की दोन मुलींची छेड काढल्यानंतर हिंसाचार भडकला.
- 'बुद्धा इन ट्रॅफिक जाम' या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. प्रशासनाने स्क्रिनिंग रोखल्याचा त्यांनी आधीच विरोध केला होता.
- शुक्रवारच्या हिंसाचारात चित्रपटाचे डायरेक्टर अग्निहोत्री यांनाही मारहाण झाली. त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली.
- याआधी डाव्या विद्यार्थी संघटनांनी 'मुझफ्फरनगर बाकी है' चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हाही येथे वाद झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये
>> कोणत्या विषयावर आहे चित्रपट
>> अनुपमसह चित्रपटात आणखी कोण
>> विवेकचे ट्विट
बातम्या आणखी आहेत...