आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja Brandishing Sword Skills During His Sangeet Ceremony

VIDEO: जडेजाच्या लग्नात फायरिंग, नवरदेवाच्या काही इंच दूर चालल्या गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. दरम्‍यान, गुजरातच्‍या राजकोटमधील हॉटेल सिझन्सबाहेर फायरिंग झाली. त्‍यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले. एका व्‍हिडिओमध्‍ये वराती फायरिंग करताना दिसत आहे. या घटनेनंतर येथील एसपी अनरप सूद म्‍हणाले, ''मला फायरिंगबाबत माध्‍यमांमधूनच माहिती मिळाली आहे. प्रकरणाचा तपास करण्‍यासाठी स्‍थानिक पोलिसांना ऑर्डर दिली आहे. त्‍यांनी मला रिपोर्ट दिल्‍यानंतर पुढील कारवाई होईल.'' जडेजापासून काही दूर अंतरावर झाली फायरिंग....

- रवींद्र जडेजाच्‍या काही अंतरावर वरातींनी ही फायरिंग केली आहे.
- राजकोट पोलिस घटनास्‍थळी पोहोचले. फायरिंग करणा-यांची ओळख पटवण्‍यात येत आहे.
- जडेजाच्‍या वरातीत नातेवाईकांनीच ही फायरिंग केल्‍याचे बोलले जात आहे.
- या फायरिंगदरम्‍यान 6 राउंड हवेत फायर करण्‍यात आले आहेत.
- जडेजाच्‍या अगदी जवळ ही फायरिंग झाल्‍याचे व्‍हिडीओमध्‍ये दिसत आहे.
जडेजाने का चालवली तलवार....
- गुजराती राजपूत लग्‍न सोहळ्यात वधू पक्षाकडून वराला तलवार भेट दिली जाते.
- तलवार भेट देणे हा लग्‍नातील एक विधी आहे.
- तलवार मिळाल्‍यानंतर वराला तलवारबाजी करून दाखवावी लागते.
- जडेजाने डाव्‍या हाताने काही वेळ तलवार हवेत फिरवली.
बेकायदेशीर आहे लग्नात फायरिंग
- परवाना असलेल्या शस्त्राच्या माध्यमातून हवेत फायरिंग करणे बेकायदेशीर आहे.
- पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात पोलिस चौकशी सुरु आहे.
- पोलिस अधिकारी महेंद्रसिंह राणा यांनी सांगितले, की आम्हाला घटनेची माहिती मिळाली आहे. आम्ही चौकशी करत आहोत.
- याबाबत प्रतिक्रिया नोंदविण्यास जडेजा आणि सोलंकी कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटो.... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ...