आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jagan Reddy Going Fast Unto Death For Whole Andhrapradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखंड आंध्र प्रदेशसाठी जगन रेड्डी यांचे तुरुंगात सुरू होणार बेमूदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे विभाजन केल्याच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तुरुंगातच बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्यांच्या घोषणेनंतर तुरुंगातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


जगन यांच्याकडून उपोषणाद्दल तुरुंग प्रशासनाला काहीही कल्पना नाही. त्यांच्याकडून काहीही लेखी माहिती मिळालेली नाही, असे चंचलगुडाचे तुरुंग अधीक्षक बी. सेदैह यांनी म्हटले आहे. जगन यांनी रविवारी सकाळी नाष्टा केला नसल्याची माहिती आहे. परंतु उपोषणासंदर्भात आम्ही आणखी बारा तासांनंतरच सांगू शकतो, असे अधिका-यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.