आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादहून हजचे विमान रद्द, विमानतळ छाेटे असल्याने उड्डाणे बंद केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/औरंगाबाद- सौदी एअरलाइन्सने देशातील पाच राज्यांच्या विमानतळांना ‘छोटे स्टेशन’ संबाेधत येथून हजसाठी जाणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. यात औरंगाबादचाही समावेश आहे.

जयपूर, रांची, वाराणसी आणि गुवाहाटीतून होणारी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे जयपूर विमानतळाचे गेल्या वर्षी हज यात्रेपूर्वीच विस्तारीकरण करण्यात आले होते. सेंट्रल हज कमिटीने यंदा हज यात्रेसाठी सौदीच्या नाझ एअरलाइन्सला कंत्राट दिले होते. गेल्या वर्षी एअर इंडियाला कंत्राट मिळाले होते, परंतु कंपनीने ते थाई कंपनीला सबलेट केले होतेे. यामुळे हज यात्रेकरूंना अडचणींना सामोरे जावे लागले होते.

हज यात्रेसाठीचे विमान रद्द करण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी आठवडाभरात नागरी उड्डयन मंत्रालय निर्णय घेणार आहे, असे औरंगाबाद हज समितीचे अध्यक्ष करीम पटेल यांनी सांगितले.