आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या भिंती, चांदीचा पलंग, एका दिवसाचे भाडे 48 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - जयपूरच्या राजवाड्यामध्ये नोव्हेंबरपर्यंत एक भव्य सूट तयार होत आहे. या सूटचे भाडे प्रतिदिन 48 लाख रुपये असेल. हॉटेलमधील सर्वात महागड्या सूटचे भाडे 7 लाख 20 हजार रुपये प्रतिदिन आहे. या सूटमध्ये चार फ्लॅट असून वैयक्तिक एलिव्हेटरही आहे. बेडरूममध्ये चांदीचा बेड आणि विर्शाम कक्षात फेरारी कंपनीने तयार केलेले वैशिष्ट्यपूर्ण नळ आहेत. भिंतींवर सुवर्णकाम केले आहे. यामध्ये डायनिंग एरियापासून किचनपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष देण्यात आले आहे. राजवाड्यात पोहोचताच पाहुण्यांचे खास राजेशाही थाटात स्वागत होते. हत्ती-घोडे, रेड कारपेटचे आदरातिथ्य सर्व काही आपल्या दिमतीला राहील. पाहुणचारासाठी 25 सदस्यांची टीम तैनात असेल. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्पेशल श्ॉम्पेन बाथ दिला जाईल.