आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर फेस्टिव्हल: करण जोहर म्हणाला - \'मन की बात\'साठी भारत योग्य भूमी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहर - Divya Marathi
करण जोहर
जयपूर - येथील लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवात वादाने झाली आहे. लेखक आणि कलावंतामध्ये असहिष्णुतेचा मुद्दा वरचढ ठरत आहे. बॉलिवूड सेलेब्रिटी करण जोहर म्हणाला, भारतात फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) हा सर्वात मोठा जोक झाला आहे, आणि लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे. दुसरीकडे रस्किन बॉन्ड यांचे म्हणणे आहे, की पुरस्कार वापसी योग्य नाही. तर, उदय प्रकाश यांच्या सारखे साहित्यिक असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणे योग्यच असल्याचे म्हणाले.

करण जोहरवर कोणती केस झाली, ज्याची त्याला लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आठवण झाली
- लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये 'अनसुटेबल बॉय' सेशनमध्ये प्रसिद्ध स्तंभ लेखिका शोभा डे यांनी करणची मुलाखत घेतली. तो म्हणाला, 'तुम्हाला 'मन की बात' करण्यासाठी - तुमच्या मनातील काही सांगायचे असेल, काही खासगी बोलायचे असेल तर भारत देशात ते शक्य नाही.'

- 'मला असे वाटत राहाते की माझ्या मागे कायम एखादी लिगल नोटीस माझा पिच्छा पूरवत आहे. येथे तुमच्या विरोधात कधी कुठे एफआयआर दाखल होईल सांगता येत नाही.'
- '14 वर्षांपूर्वी माझ्यावर राष्ट्रगीताच्या अवमानाची केस झाली होती, त्या झळा मी भोगल्या आहेत. तुम्ही तुमचे स्वतःचे मत मांडणे आणि लोकशाहीच्या वल्गना करणे, या दोन्ही गोष्टी येथे करणे म्हणजे फार मोठी थट्टा आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पिचच्या गप्पा करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, एक मोठी कॉन्ट्रव्हर्सी निर्माण होते.'
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले उदय प्रकाश