जयपूर - जयपूरमध्ये बुधवारी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. पाच दिवस चालणा-या या महोत्सवातील पहिल्या दिवशी गीतकार प्रसून जोशी यांनी गाजवला. महोत्सवात ४०० हून जास्त साहित्यिक ७० हून अधिक कार्यक्रमात भाग घेतील. पहिल्या दिवशी ३१ सत्रे पार पडली.
‘तारे जमीं पर’ या सत्रासाठी यतींद्र मिश्र यांनी प्रसून जोशी यांची मुलाखत घेतली. दोघांच्या संवादातून श्रोत्यांना कवितेच्या मुळापर्यंत गेल्याची अनुभूती मिळाली. दोघांमध्ये झालेली
प्रश्नोत्तर पुढीलप्रमाणे:
यतींद्र : मिर्झा गालिब किंवा अन्य कोणत्या कवींची छाप कोण्या कवीवर पडत नाही का?
प्रसून : कोणाची छाप पडत नाही, असे होऊच शकत नाही. तुम्ही जे काही होऊ पाहत आहात याचे प्रतिबिंब तुमच्या कामात दिसत असते. भले तुम्ही कोणतेही काम करत असेनात. इच्छित स्थिती प्राप्त करण्यासाठीचे हे प्रयत्न असतात, मी पण तेच करत आहे.
यतींद्र : तुम्ही शब्दांशी खेळता की शब्द तुमच्याशी
प्रसून : मी शब्दांचे बोट धरून चालतो. शब्दच माझा मार्ग सुकर करतात. शब्द अधांतरीत वास्तव नाही तर ती संस्कृतीची गोळी आहे. शब्दासोबत अनेक भाव जोडलेले असतात. उदा. डोंगराखाली एखादा घडलेला दगड दृष्टिक्षेपात पडतो. वास्तवात अनेक शतकांच्या जडणघडणीतून तो आकाराला आलेला असतो. शब्दाचेही तसेच आहे. नव्या शब्दाचेही तसेच असते. तो घडल्यानंतर आखीव,रेखीव बनतो.
यतींद्र : उर्दू शायर गीत लेखन करतो तेव्हा तो शुद्ध हिंदीत लिहितो. याकडे तुम्ही कसे पाहता.
प्रसून : ब-याचशा गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकत नव्हत्या तेव्हा कवितेतून त्या लक्षात ठेवल्या जात असत. सध्या कवितेची उपयोगिता कितपत आहे,याचा
आपण विचार केला पाहिजे. कथेतून व्यक्त न होणारे भाव काव्यातून उमटतात काय? उदा: आज सजन हमें अंग लगा ले, जनम सफल हो जाए...। यातील भाव कथा किंवा संवादात लिहिल्यास ते अश्लील वाटेल. मात्र, कविता लिहिल्यानंतर त्यास मर्यादा प्राप्त होते.