जयपूर - जयपूर मेट्रो तिच्या पहिल्याच फुल ट्रायलमध्ये प्लॅटफॉर्मला बाजुने घासली. या वेळी मेट्रोचा वेग ताशी केवळ 5 किमी एवढाच होता, त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. बुधवारी मेट्रोची पहिलीच फुल ट्रायल होती. त्यात मानसरोवर ते चांदपोल स्थानकादरम्यान चाचणी घेण्यात आली. प्लॅफॉर्मला धडकल्यानंतर मेट्रो थांबवण्यात आली. अधिकारी रात्री उशीरापर्यंत या प्रकाराच्या कारणांचा शोध घेत होते.
ही चाचणी बुधवारी सायंकाळी 7.52 वाजता सुरू झाली. मेट्रो चांदपोलपर्यंत 9.28 किलोमीटर धावली. या दरम्यान मेट्रोने 9 स्थानकांवरून प्रवास केला. त्यापैकी आठ स्थानके एलिव्हेटेड आणि एक अंडरग्राउंड होते. आतापर्यंत फक्त मानसरोवरपर्यंतच मेट्रोची चाचणी झाली होती.
(प्लॅटफॉर्मला धडकल्यानंतर तांत्रिक तपासणी करताना मेट्रोचे अधिकारी.)
पुढील स्लाइडवर पाहा प्लॅटफॉर्मला धडकलेल्या मेट्रोच्या कोचवर पडलेले स्क्रॅच आणि चाचणीचे PHOTOS