आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaipur Metro Work On Last Stage, Ready To Run In 30 Days

जयपुर मेट्रो महिन्याभरात धावणार, तयारी अंतिम टप्प्यात; पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जयपुर मेट्रो ट्रेन धावण्यासाठी तयार झाली आहे. कमिश्नर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून अंतिम अहवाल येताच गुलाबी शहरातून मेट्रो धावू लागेल. याबाबत सांगितले जात आहे की, महिन्याभरात येथील मेट्रो धावू शकेल. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो धावू शकेल असे प्रशासनाने म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यात मानसरोवर ते चांदपोल या दरम्यान सुमारे 12 किमी अंतरावर ही मेट्रो धावेल. या दरम्यान एकून 9 स्टेशन्स पडतील. या स्टेशन्सची बहुतेक कामे झाली आहेत व त्यावर फिनिशिंग टच दिला जात आहे. काही दिवसापूर्वी सीएमआरएसने जयपूर मेट्रोची पाहणी केली होती. त्यात कोणत्याही त्रुटी आढळल्या नव्हत्या.

चार स्टेशन्सवर काही काम बाकी-
सिविल लाईन्स, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅंप आणि चांदपोल स्टेशन्सवर काही बांधकाम सुरु असून तेथील फिनिशिंग काम अद्याप बाकी आहे. मेट्रो अधिका-यांच्या माहितीनुसार, या बांधकामाचा सुरक्षेशी काहीही संबंध नाही. हे साईडचे अतिरिक्त काम आहे. उद्घाटनपूर्वी हे काम पूर्ण झालेले असेल.

1000 पानाचे डिटेलिंग एप्लीकेशन तयार-
1 मार्चपर्यंत मेट्रो जनतेच्या सेवेत आणण्यासाठी प्रशासनाने सुमारे एक हजार पानाचे डिटेलिंग एप्लिकेशन तयार केले आहे. जे लवकरच सीएमआरएसला पाठवले जाईल. यानंतर सीएमआरएस फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जयपुर मेट्रोची अंतिम पाहणी करेल. ज्यात सर्व सुरक्षा व्यवस्था झालेली आहे ना याची पाहणी केली जाईल. त्यादरमयान मेट्रोचे ट्रॅक, कोच, सिग्नल, रोलिंग स्टॉक, फायर, एम्बुलेंस, पॅसेंजर सेफ्टी, लाईन, स्वच्छता आदीचे पुन्हा निरीक्षण केले जाईल.

जयपूर मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर अश्वनी सक्सेना यांनी सांगितले की, सर्व अहवाल व तयारी अंतिम टप्प्यात आहे. डिटेलिंग एप्लिकेशन एक-दोन दिवसात पाठवली जातील. काही स्टेशन्सवर काम बाकी आहे मात्र मेट्रो धावण्यासाठी त्याचा अडसर नाही असे सक्सेना यांनी सांगितले.
पुढे पाहा, जयपूर मेट्रोचे INSIDE PHOTOS...