आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर : व्हॅनमध्ये घुसला साप; चालक म्हणाला, अरे बाप !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान) - येथे एका पोलिस व्हॅनमध्ये साप घुसला. त्याने इंजिनजवळ ठाण मांडले. त्या वेळी व्हॅनजवळ १५ पोलिस कर्मचारी होते. पण प्रकार लक्षात येताच सर्वांनी व्हॅन सोडून धूम ठोकली. सापाला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, काठीने डिवचून बघितले, गाडी पुढेमागे करून पाहिली.
इतकेच नव्हे तर पाण्याचा टँकर मागवून आत जोराचा फवारा मारला. तरीही साप काही बाहेर पडलाच नाही. दीड - दोन तास हा प्रकार सुरू होता. शेवटी एका गारुड्याला बोलावण्यात आले. त्याने काही मिनिटांतच सापाला बाहेर काढले. त्यानंतर गायब पोलिस जवळ आले व त्यांनी या सापाची छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद केली. छाया : निरंजन चौहान.