आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामाचे वंशज आहे हे राजघराणे, अशी आहे या रॉयल फॅमिलीची LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरचे राजघराणे. - Divya Marathi
जयपूरचे राजघराणे.
जयपूर - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशातील सर्व संस्थाने त्यांची राजेशाही खालसा झाली. तरीही असे अनेक राजघराणे आहेत जे आजही त्याच रूबाबात राहतात. त्यांची प्रजा आजही त्यांना राजा मानते. असेच एक जयपूरचे राजघराणे आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयपूरच्या महाराणी पद्मिनी देवी म्हणाल्या होत्या की, हे राजघराणे श्रीरामाचे वंशज आहे.
 
असा आहे हा शाही परिवार...
- या मुलाखतीत पद्मिनीदेवी म्हणाल्या, त्यांचा परिवार श्रीरामांचा मुलगा कुश यांचा वंशज आहे.
- त्यांचे पती आणि जयपूरचे माजी महाराज भवानी सिंह कुश यांचे 309वे वंशज होते. 
- 21 ऑगस्ट 1912ला जन्म झालेल्या राजा मानसिंह यांनी तीन लग्ने केली होती. पहिले लग्न 1924मध्ये वयाच्या 12व्या वर्षी जोधपूरचे महाराजा सुमेरसिंह यांची बहीण मरुधर कंवरशी झाले होते.
- मानसिंह यांचे दुसरे लग्न त्यांच्या पहिल्या पत्नीची भाची किशोर कंवर यांच्याशी 1932 मध्ये झाले. यानंतर 1940 मध्ये त्यांनी गायत्री देवींशी तिसरा विवाह केला.
 
12 वर्षांच्या वयातच पद्मिनीदेवींचा नातू झाला राजा
- महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांना पुत्ररूपात भवानी सिंह झाले. भवानी सिंहांचे लग्न पद्मिनीदेवींशी झाले होते. त्यांना दिया कुमारी ही एकुलती एक मुलगी आहे.
- नंतर दिया कुमारींचे लग्न नरेंद्र सिंहांशी झाले. त्यांना दोन मुले झाली पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह, तर मुलगी आहे गौरवी. दिया सध्या सवाई माधोपूर येथून भाजप आमदार आहेत.
- पद्मनाभ सिंहने वयाच्या 12व्या वर्षी जयपूर रियासत सांभाळायला सुरुवात केली. तर दुसरा मुलगा लक्ष्यराज सिंहने वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच ही जबाबदारी सांभाळली.
- तथापि, देशात आता पूर्णपणे राजेशाही संपुष्टात आलेली आहे. पण तरीही राजघराण्यांत परंपरेच्या रूपात राज्याभिषेक केला जातो. याद्वारे राज्याचा वारसाहक्क प्रतीकात्मक रूपात पुढे हस्तांतरित केला जातो. 
 
अशी आहे लाइफस्टाइल
- महाराणी पद्मिनी देवी नेहमी शहरात होणाऱ्या लहान मोठ्या कार्यक्रमांत चीफ गेस्ट म्हणून हजर असतात.
- दुसरीकडे, त्यांची मुलगी दिया कुमारी सवाई माधेपूर येथून एमएलए आहे. त्या नेहमी राजस्थानात होणाऱ्या अनेक इव्हेंट्समध्ये दिसतात.
- यासोबतच दिया कुमारींचा मुलगा आणि जयपूरचे राजे पद्मनाभ सिंह भारतीय पोलो टीमचे खेळाडू आहेत.
- हा शाही परिवार जयपुरात होणाऱ्या रॉयल समारंभांत अनेकदा दिसून येतो.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, गायत्रीदेवींच्या फॅमिलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...