आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaishankar Appointed New Foreign Secretary Of India

एस जयशंकर नवे परराष्ट्र सचिव, स्वराज यांच्या मर्जीविरोधात सुजाता सिंग यांना हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - एस. जयशंकर आणि ओबामा यांचे संग्रहित छायाचित्र.
नवी दिल्ली - भारताच्या परराष्ट्र सचिवपदी एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सिंग यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सुजाता यांनी सुट्टी करण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत.
एस. जयशंकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे यावेळी सुजाता सिंग यांची याठिकाणी उपस्थिती नव्हती. परंपरेनुसार मावळते परराष्ट्र सचिव नव्या सचिवांना पदाची जबाबदारी सोपवत असतात. जयशंकर यांनी यापूर्वी भारताच्या अमेरिकेतील राजदुताची जबाबदारी सांभाळली आहे. भारत-अमेरिकेदरम्यान 2008 साली झालेल्या अणु नागरी सहकार्य करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

सुजाचा सिंह यांच्या परराष्ट्र सचिव पदाचा सुमारे आठ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समिती यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जयशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जयशंकर यांची अमेरिकेचे राजदूत म्हणून डिसेंबर 2013 मध्ये नियुक्ती झाली होती. त्याआधी त्यांनी चीनचे राजदूत म्हणूनही काम सांभाळले आहे. तसेच सिंगापूरचे उच्चायुक्तही होते. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2008 मध्ये झालेल्या भारत अमेरिका अणुनागरी सहकार्य करारादरम्यानही या सर्वात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

सुजाता सिंग यांची नियुक्ती झाली त्यावेळीही पंतप्रधान मनमोहन सिंग यांची परराष्ट्र सचिव पदासाठीची पहिली पसंती जयशंकर हेच होते. पण सेवाज्येष्ठतेचा विचार करून सुजाता सिंग यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सुजाता यांच्या नियुक्तीसाठी सोनियांचा दबाव होता, अशाही चर्चा आहेत.
पुढील स्लाइड्वर वाचा, का हटवले सुजाता सिंग यांना...