आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफूची रोपे लावून सुशोभीकरण, जयपूरमधील जेडीए कर्मचार्‍यांनी केला अफलातून प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - शहराच्या सुशोभीकरण करण्यासाठी फळे, फुलझाडे विविध प्रकारांची रोपे उपलब्ध असताना कुणी अफूचे रोपण करेल काय? परंतु जयपूर शहरातील जेडीएच्या कर्मचार्‍यांनी हा अफलातून प्रकार केला आहे. त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये जेएलएन मार्गावर अन्य फुलझाडांसोबत चक्क अफूची झाडे लावून टाकली. वर त्याला कुणाचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्याभोवती तारांची जाळीही ठोकली. जेडीएच्या कर्मचार्‍यांनी बहुधा नशेतच केलेल्या या प्रकाराचे परिणाम आता दिसू लागले असून बोंडे आलेली अफूची रोपही जयपूरच्या गुलाबी हवेच्या तालावर डोलायला लागली आहेत. जेएलएन मार्ग, सरस डेअरी कार्यालयाबाहेर अफूची रोपे डोलताना पाहावयास मिळतात.

नार्कोटिक्स विभागाचे उपआयुक्त एस. आर. शर्मा यांनी सांगितले की, सजावटीसाठी म्हणून अफूची रोपे लावायची म्हटली तरीही त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. अन्यथा एनडीपीएस कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो व त्यासाठी 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक व्यसनी लोकांनी अफूची कच्ची बोंडे तोडून नेऊन त्याची नशा करण्यास सुरुवात केली आहे. कच्च्या बोंडांमधूनही एक - दोन थेंब अफू काढल्यास त्याचीही नशा होऊ शकते.

अक्षम्य ढिलाई कुणाची?
जेडीएचे निवृत्त ज्येष्ठ उद्यानतज्ज्ञ पी. के. पांडे (यांची याच महिन्यात वनविभागात बदली झाली आहे.) यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2013 मध्ये या मार्गावर सुशोभीकरणासाठी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले होते. ते काम माझ्या काळात झाले; परंतु त्यात अफूची झाडे लावली गेली नव्हती. मात्र, जेडीएने सजावटीसाठी म्हणून अफूची रोपे (पोपी प्लांट) अनेक ठिकाणी लावली होती. हंगामी फुलझाडांसोबत ही रोपे आली होती. दुसरीकडे सरस कार्यालयातील कर्मचार्‍यांनी ही रोपे जेडीएनेचे लावल्याची व त्याची देखभालही त्यांनीच केल्याचा आरोप केला आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे, रोपे अफूचीच
राजस्थान विद्यापीठातील बॉटनीचे तज्ज्ञ डॉ. आर. डी. अग्रवाल यांनीही ही रोपे अफूचीच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अफूची काही रोपे ही सजावटीसाठीच असतात. अनेक उद्यानातही ती लावली जातात. त्यांची लांबी सरासरी दीड फुटाची असते व त्याला हिरवी बोंडे, पांढरी फुले येतात. जेएलएन मार्ग, सरस डेअरीसमोरील रोपे देसी अफूची आहेत. त्यांची लांबी तीन ते चार फुटांची आहे.