आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jal Bharo Agitation For The Support Of Aasaram, Chakrapani Declared

आसाराम यांच्या समर्थनार्थ 5 फेब्रुवारीपासून संतांचे जेल भरो,चक्रपाणी याची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम यांना 4 फेब्रुवारीपर्यंत जामीन न मिळाल्यास धर्मरक्षा मंचाशी संबंधित संत देशभरात जेल भरो आंदोलन करतील, असा इशारा संत समितीचे राष्‍ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी दिला आहे. ते येथे धर्मरक्षा मंच संमेलनात बोलत होते.
आसाराम यांना गुजरात आणि महाराष्‍ट्रात न्याय मिळणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी सूरसागरचे आमदार सूर्यकांता व्यास, जोधपूर शहर मतदारसंघाचे आमदार कैलास भन्साळी उपस्थित होते. मात्र, दोन्ही आमदारांनी आसाराम यांच्याशी काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट केले.
अत्याचारानंतर स्वत: कपडे धुतले : आचा-याचा दावा
आसाराम यांनी सुरतच्या पीडित मुलीशी अत्याचार केल्यानंतर स्वत: कपडे धुतले होते. पीडित तरुणी आसाराम यांच्या आश्रमातून बाहेर पडताना रडत होती. त्यांनी मलाही घरी जाऊ दिले नव्हते, असा जबाब आसाराम यांचा माजी स्वयंपाकी अखिलेशने एसआयटीला दिला आहे. या व्यतिरिक्त 2005 मध्ये गुजरातच्या मोडासा येथील आश्रमात आसाराम यांनी सहा महिला साधकांशी गैरवर्तन केले होते. एसआयटीने आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे.