आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalandha Football Industry News In Marathi, FIFA World Cup

जालंधरच्या फुटबॉल इंडस्ट्रीजच्या ‘किक’ने चीनलाही गुंडाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ब्राझीलमधून गुरुवारपासून फिफा वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. त्याचा फीव्हर सध्या जगभरात पसरल्याचे दिसत आहे. फुटबॉलच्या या रणांगणात भारतीय संघ जरी सहभागी नसला तरीही त्यात जालंधरच्या फुटबॉल इंडस्ट्रीजचे मोठे योगदान आहे, ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरू शकते. विशेष म्हणजे जालंधरच्या फुटबॉल इंडस्ट्रीजने या वेळी चक्क चीनवरही मात केली आहे. जालंधरमध्ये तयार झालेले तब्बल 15 लाख फुटबॉल जगभरातील मैदाने गाजवणार आहेत.

फुटबॉल विश्वचषकाचा जालंधरच्या स्पोर्ट इंडस्ट्रीजला यंदा मोठा फायदा झाला आहे. 2010 मध्ये या ठिकाणी केवळ दोन लाख फुटबॉल तयार होत होते. यंदा ही संख्या 15 लाखांच्या घरात गेली आहे. इथल्या फुटबॉल इंडस्ट्रीने त्याचे तंत्रज्ञान चीनकडून आयात केले. पूर्वी येथे हाताने फुटबॉल शिवून तयार केले जात असत. परंतु त्याऐवजी आता चीनकडून स्टिचिंग मशीन विकत घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर ही भलीमोठी आॅर्डर अवघ्या दोन महिन्यांतच पूर्ण करण्यात आली. याउलट चीनला पाच लाख फुटबॉलची आॅर्डरही पूर्ण करता आली नाही.

देशात केवळ जालंधरमध्येच फुटबॉल बनतात
भारतात खरे तर पंजाबपेक्षा मोठी स्पोर्ट्स गुडस इंडस्ट्री मेरठमध्ये आहे. परंतु फुटबॉल केवळ जालंधरमध्येच तयार होतात. यात चार - पाच कंपन्याच प्रामुख्याने हे काम करतात.

या देशांत पाठवले
इंग्लंड, जर्मनी, ब्राझील, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी (भारतात मिझोरम, सिक्कीम, मेघालय, गोव्यातूनही आॅर्डर मिळाल्या आहेत.)
चीन बादशहा, भारत तिसर्‍या क्रमांकावर

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा फुटबॉल
एक्सपोर्टच्या बाबतीत जालंधरने भलेही आघाडी घेतली असेल. परंतु येथे तयार होणारे फुटबॉल फिफा वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये वापरले जात नाहीत. चीनमधून सर्वाधिक फुटबॉल एक्स्पोर्ट होत असले तरीही तेथेही वर्ल्डकपचे सामने खेळवले जावेत असे दर्जेदार फुटबॉल तयार होत नाहीत. त्यामुळे त्यावर पाकिस्तानचा एकछत्री अमल आहे. पाकिस्तान मेड फुटबॉलच विश्वचषकासाठी वापरले जातात.

स्पोर्ट्स गुडससाठी विदेशांवर अवलंबून
> 770 कोटींची निर्यात 2012-13 मध्ये झाली. तर 2400 कोटींचे साहित्य आयात करावे लागले
> 2008-09 मध्ये भारताने केवळ 681 कोटींचे स्पोर्ट्स साहित्य आयात केले होते.
> 7 टक्के निर्यात विकासदर
> 37 टक्के आयात विकासदर

पिछाडीवर पडण्याची कारणे
> सिंथेटिक रॉ मटेरियलची कमतरता. चीन, तैवान, जपान आदी देशांतून आयात करावे लागते.
> आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव. पाकिस्तानकडेही तंत्रज्ञान नाही. परंतु त्यांच्याकडे कुशल कामगार विपुल प्रमाणात मिळतात.
> देशात क्रीडा साहित्याच्या कच्च्या मालावर 15 ते 20 टक्के आयात शुल्क आकारले जाते. इतर देशांत ते खूप कमी आहे.
> नफा कमी असल्याने उत्पादक कंपन्या विक्री व्यवसायात उतरत नाहीत.