आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Administration Handovers Digital Guddi To Central Govt

‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’साठी जळगावची अनाेखी ‘डिजिटल गुड्डी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या माेहिमेसाठी जळगाव प्रशासनाने ‘डिजिटल गुड्डी’ बुधवारी केंद्र सरकारला भेट दिली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांना ही कल्पना अावडली. देशभरातील या माेहिमेसाठी जळगावची ही कल्पना अमलात अाणली जाऊ शकते.
डिजिटल इंडिया अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ मध्ये जळगावच्या खासदार रक्षा खडसे व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मनेका गांधी यांना दिलेल्या गुड्डी या डिजिटल फलकाचे चांगलेच काैतुक झाले अाहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाेबत देशभरात ही डिजिटल गुड्डी पाेहोचावी यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले.

अापल्या उपक्रमाची माहिती देताना जळगाव जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘शाळेत जाणाऱ्या मुलीचे चित्र असलेल्या या फलकावर अाॅडिअाे-व्हिडिअाेसह चित्रांच्या माध्यमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा याेजनेची माहिती दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात अालेले हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरणार असून, अापल्या लेकीला शाळेत पाठविण्यास पालकांमध्ये जागरुकता निर्माण हाेणार अाहे. मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य काही शासकीय कार्यालयांत असे फलक लावून या अभियनाची जाहिरात करण्यात येत अाहे. या अभियानाला मूर्तरूप मिळावे यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.नाना पाटील यांनी सहकार्य केले आहे.’